New Year Good Luck Traditions : नवीन वर्षात ‘गुडलक’चे हे आहेत 12 तोडगे, तुमच्याही कामी येऊ शकतात

पोलीसनामा ऑनलाइन टीम – प्रत्येकजण आपआपल्या परीने नवीन वर्षाचे स्वागत करत असतात. काही लोक नवीन वर्षासाठी विविध संकल्प करतात, तर काही लोक गुडलकच्या पद्धती अजमावतात, जेणेकरून त्यांचे पूर्ण वर्ष चांगले जावे. जगात असे अनेक देश आहेत जिथे विचित्र पद्धतीने नव्या वर्षाचे स्वागत केले जाते. असे मानले जाते की, या ट्रेडिशनल पद्धती गुडलक घेऊन येतात. या पद्धतींबाबत जाणून घेवूयात…

नवीन वर्षाला मासे खाणे –
चीनसह अनेक देशात नवीन वर्षाला सायंकाळी मासे खाण्याची परंपरा आहे. मासा नेहमी एकाच दिशने पुढे जाते, जो प्रगतीचे प्रतिनिधीत्व करतो, असे मानले जाते.

चवळी खाणे –
यहूदी परंपरेनुसार, चवळी खाऊन नवीन वर्षाचे स्वागत करणे शुभ मानले जाते. जे 1 जानेवारीला सायंकाळी चवळीची डिश बनवतात, त्याचं पूर्ण वर्ष लकी राहाते. काही कुटुंबांमध्ये या डिशखाली पैसे ठेवण्याची परंपरा आहे, ज्यामुळे भाग्याची साथ जास्त मिळते असे मानले जाते.

12 द्राक्ष खाण्याची परंपरा –
स्पेनमध्ये नवीन वर्षाचे स्वागत 12 द्राक्ष खाऊन केले जाते. रात्री 12 वाजता न्यू ईयरची बेल वाजताच लोक प्रत्येक घंटीसोबतच एक द्राक्ष खातात. यामुळे नवीन वर्षात गुडलक मानले जाते. असे मानले जाते की, जो व्यकती बेलसोबत 12 द्राक्ष खाऊ शकत नाही त्याच्यासाठी नवीन वर्ष अनलकी ठरते.

किस करणे –
जर्मनीसह अनेक देशांमध्ये नव्या वर्षाचे स्वागत रात्री 12 वाजता आपल्या प्रिय व्यक्तीला किस करून केले जाते. असे केल्याने वर्षभर गुडलक लाभते असे मानले जाते.

खुर्चीतून उडी मारणे –
डेनमार्कमध्ये लोक नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी खुर्चीवर उभे राहतात आणि 12 वाजताच खुर्चीतून जमीनीवर उडी मारतात. असे केल्याने गुडलक येते आणि वाईट आत्मा दूर होतो, असे मानले जाते.

प्लेट तोडणे –
डेनमार्कमध्ये नव्या वर्षाला प्लेट तोडणे खुप शुभ मानले जाते. येथे लोक आपले मित्र आणि कुटुंबातील सदस्यांच्या दरवाजांवर प्लेट तोडतात. पुढील दिवशी ज्याच्या घरासमोर जेवढ्या जास्त प्लेट तुटलेल्या आढळतील, त्यास तेवढे भाग्यशाली मानले जाते.

खिडकीतून पाणी बाहेर फेकणे –
प्यूर्टो रिकोमध्ये नव्या वर्षाला खिडकीतून बाहेर बादलीभर पाणी फेकणे शुभ मानले जाते. यामुळे वाईट आत्मा दूर जातो असे मानले जाते. येथे लोक गुडलक आणण्यासाठी घराच्या बाहेर साखर सुद्धा शिंपडतात.

रिकामी सूटकेस घेऊन फिरणे –
कोलंबियामध्ये लोकांना फिरायला खुप आवडते. नव्या वर्षात येथे रिकामी सुटकेस घेऊन एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी फिरण्याची परंपरा आहे. यामुळे नवीन वर्षात खुप फिरायले मिळते असे मानले जाते.

लाटांवर उडी मारणे –
ब्राझीलसह अनेक देशांमध्ये न्यू ईयरचे स्वागत लाटांवर उड्या मारून केले जाते. नव्या वर्षाला बीचवर जाऊन लोक समुद्रांच्या लाटांवर उड्या मारतात. एका लाटेवर एक विश मागण्याची परंपरा आहे. यामुळे नव्या वर्षात भाग्य वाढते आणि सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते.

सफेद कपडे घालणे –
ब्राझीलमध्ये नव्या वर्षाच्या सायंकाळी सफेद कपडे घालण्याची परंपरा आहे. संपूर्ण वर्षभर गुडलक आणि शांतीसाठी यादिवशी लोक सफेद कपडे घालतात.

दरवाजे-खिडक्या उघड्या ठेवणे –
फिलिपिन्समध्ये लोक नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी घराचे दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवतात. यामुळे जुने दिवस बाहेर जातात आणि नव्या वर्षात गुडलक विना अडथळा आत येते, असे मानले जाते.

विश पेपर जारमध्ये ठेवणे –
अनेक देशांमध्ये नव्या वर्षाला आपली विश एका पेपरवर लिहून तो जारमध्ये ठेवण्याची परंपरा आहे. हा जार पुढील वर्षापर्यंत सांभाळून ठेवला जातो आणि नववर्षाच्या पूर्व संध्येला तो खोलून पाहिले जाते की, मागच्या वर्षात त्यापैकी किती इच्छा पूर्ण झाल्या.