नववर्षात रेल्वेनं सुरू केली नवीन सुविधा, ‘या’ नंबरवर आजपासून मिळणार 8 सेवा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नवीन वर्षात भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सेवेसाठी असलेल्या हेल्पलाईन क्रमांक 139 मध्ये एक मोठा बदल केला आहे. आता विविध सेवांसाठी या एकाच क्रमांकावर कॉल करता येणार आहे. 1 जानेवारी म्हणजेच आजपासून याचा वापर करता येणार आहे. भारतीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान, रेल्वेने दुसरीकडे नवीन वर्षात प्रवास भाडेवाढ करून प्रवाशांना चांगलाच धक्काही दिला आहे.

पीयूष गोयल यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, रेल्वेच्या वेगवेगळ्या हेल्पलाईन क्रमांकांचे एकत्रिकरण करून ते 139 मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत, हा क्रमांक इंटरअ‍ॅक्टिव्ह व्हॉईस रिस्पॉन्सवर आधारित आहे. ही व्यवस्था 1 जानेवारीपासून सुरू झाली आहे. ही सुविधा सुरू झाल्याने प्रवाशांना वेगवेगळ्या मदतीसाठी वेगवेगळ्या क्रमांकाऐवजी केवळ एकच हेल्पलाईन क्रमांक 139 लक्षात ठेवायचा आहे.

महितीनुसार, भारतीय रेल्वेत प्रवाशांच्या सुविधेसाठी आणि सेवांसाठी अनेक फोन क्रमांक होते. यामुळे गरज असलेल्या प्रवाशांचा अनेकदा गोंधळ उडत असे. हे लक्षात घेऊन भारतीय रेल्वेच्या अनेक हेल्पलाईन क्रमांकाऐवजी केवळ 139 क्रमांकच सुरू करण्यात आला आहे. आता तुम्ही केवळ 139 क्रमांकाचा वापर करून रेल्वेशी संबंधीत प्रत्येक समस्या सोडवू शकता.

प्रत्यक्षात, भारतीय रेल्वेने 139 सेवा क्रमांकास एकीकृत रेल्वे हेल्पलाईनमध्ये रूपांतरित आहे. हा क्रमांक इंटरअ‍ॅक्टिव्ह व्हॉईस रिस्पॉन्स सिस्टमवर आधारित आहे. यामुळे प्रवाशांना वेगवेगळे क्रमांक लक्षात ठेवण्याची गरज नाही.

प्रवास भाडेवाढ
तसेच नवीन वर्षात भारतीय रेल्वेने प्रवास भाडेवाढ करून लोकांना मोठा धक्काही दिला आहे. नवीन भाडेवाढ 1 जानेवारीपासून लागू होणार आहे. या भाडेवाढीचा मोठा फटका दूरचा प्रवास करणार्‍या प्रवाशांना बसणार आहे. रेल्वेने 4 पैसे प्रति किलोमीटर भाडेवाढ केली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

मधुमेह असल्यास आहारामध्ये करा ‘या’ ४ पदार्थांचा समावेश
‘हे’ ७ उपाय केल्यास सतत येणारा थकवा जाईल पळून, जाणून घ्या
जेवण पॅक करण्यासाठी ‘फॉईल पेपर’ वापरता ? ‘हे’ ७ दुष्परिणाम जाणून घ्या
मासिक पाळीत स्वच्छता राखण्यासाठी ‘या’ ६ गोष्टी लक्षात ठेवा !
गूळ खाण्याने वाढते वजन, जास्त खाण्याचे ‘हे’ ६ तोटे जाणून घ्या
मातेच्या स्तनपानामुळे बाळांना होतात ‘हे’ ६ फायदे, जाणून घ्या
लवंग खाण्याचे ‘हे’ ६ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का ?