Coronavirus : भयंकर ! ट्रकवर उभारलं जातय ‘शवागृह’, लवकरच ‘या’ शहरात वाढणार मृतांची संख्या

न्यूयॉर्क : पोलीसनामा ऑनलाइन –  जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनामुळे जगभरात 20 हजार पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या महासत्ता असलेल्या अमेरिकेमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असून कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनामुळे न्यूयॉर्कची सर्वाधिक वाईट परिस्थिती आहे. एकट्या न्युयॉर्कमध्ये 30 हजारापेक्षा अधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. या ठिकाणी दर तीन दिवसाला रुग्णांच्या संख्येत दुपटीने वाढ होत असून ही अमेरिकेसाठी चिंतेची बाब आहे.

माध्यमांच्या वृत्तानुसार, येत्या काही दिवसांमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे न्युयॉर्कमध्ये सध्या कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाचे मृतदेह ठेवण्यासाठी तयारी करण्यात येत आहे. न्युयॉर्कची लोकसंख्या 8 दशलक्ष आहे. अलिकडेच कोरोनामुळे या ठिकाणी 150 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहेत. ताज्या आकडेवारीवरून अमेरिकेत आतापर्यंत 65 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

तंबू आणि टक्रवर शवगृह

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, न्यूयॉर्कमधील अनेक हॉस्पीटलमध्ये तंबू आणि रेफ्रिजरेटेर बांधले जात आहेत. तेथील मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी, परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. या ठिकाणी आपत्कालीन परिस्थितीची घोषणा यापूर्वीच करण्यात आली आहे. तसेच 9/11 च्या हल्ल्यानंतर ज्याप्रमाणे शवगृह तयार करण्यात आली होती तसे शवगृह तयार करण्यात येत आहेत. मुख्य म्हणजे कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर रुग्णाचा मृतदेह वेगळा ठेवला जातो. जेणेकरून हा संसर्ग आणखी पसरू नये. भारतात अशा मृतदेहांचे पोस्टमार्टम केले जात नाही. भारतामध्ये मृतदेह दफन करण्यासाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

अमेरिकेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, न्यूयॉर्कबरोबरच उत्तर कॅरोलिनामध्येही तंबू आणि ट्रकवर शवगृह उभारले जात आहेत. आतापर्यंत अमेरिकेत 9 हजार पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर येत्या काही दिवसांमध्ये न्ययॉर्कमध्ये व्हेंटिलेटरची कमतरता देखील भासू शकते असे सांगण्यात येत आहे. अमेरिकेत 20 टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण आयसीयूमध्ये दाखल असून 80 टक्के रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

You might also like