‘न्यूयॉर्क फॅशन वीक 2019’ मध्ये प्रियंका आणि कृति सेननची हटके ‘ड्रेसिंग’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ‘न्यूयॉर्क फॅशन वीक 2019’ मध्ये देशभरातील अनेक नामांकित सेलिब्रिटींनी रेड कार्पेटवर हजेरी लावली. यानिमित्ताने भारताची प्रसिद्ध अभिनेत्री कृति सेनन आणि प्रियंका चोप्रा यांनीही आपला जलवा दाखविला. प्रियांका यापूर्वी बर्‍याचदा न्यूयॉर्क फॅशन वीकचा भाग राहिली आहे, पण ‘न्यूयॉर्क फॅशन वीक 2019’ मध्ये हजर राहिल्यावर कृतिसाठी ही पहिली वेळ होती. भारताच्या या दोन्ही अभिनेत्री खूपच सुंदर आणि मोहक दिसत होती. चला त्यांच्या ड्रेसिंग आणि स्टाइलबद्दल जाणून घेऊया …
Priyanka-Chopra
न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये प्रियंका चोप्राने ब्लॅक, फुल स्लीव्स काफ लेंथ ड्रेसमध्ये डिझाइन केलेला ड्रेस परिधान केला होता. डिझायनरने प्रियांकासाठी कट-टॉप डिझाइन केले. हा ड्रेस प्रियांकासाठी सुप्रसिद्ध डिझायनर mimi cuttrell यांनी डिझाइन केला होता. ‘न्यूयॉर्क फॅशन वीक 2019’ मध्ये प्रियांका शोमध्ये भाग घेण्यासाठी आली होती.
Kriti-Sanon
यासह कृति सेननेही या कार्यक्रमात भाग घेतला होता. शोमध्ये कृतिने ग्रीन मेटलिक कलरचा ड्रेस घातला होता जो फ्लोरल प्रिंट होता. या ड्रेसवर कृति खूपच सुंदर दिसत होती.