न्यूयॉर्कमध्ये गोळीबारात 4 जणांचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेत न्यूयॉर्कमध्ये ब्रूकलिन काऊंटीच्या एका क्लबमध्ये शनिवारी अज्ञात बंदूकधाऱ्यांकडून गोळीबार करण्यात आला. त्यात 4 जणांचा मृत्यू झाला आणि 3 जण घायाळ झाले. पोलिसांनी सांगितले की डीन सेंट एन क्राऊन हाइट्स जवळ यूटिका अ‍ॅवेमध्ये स्थित सोशल क्लब ट्रिपल ए एक्सेस मध्ये सकाळी 7 च्या दरम्यान ही घटना घडली.

पोलीस घटनास्थळी पोहण्याआधीच चार जणांचा मृत्यू झाला आणि तीन लोक घायाळ झाले. त्यांनी सांगितले की जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले, ज्यात एका महिलेचा देखील समावेश आहे. यात अजून कोणाला ताब्यात घेण्यात आले नाही आणि गोळीबार करणारे नक्की कोण होते अजून याची माहिती देखील मिळाली नाही.
New York
पोलिसांनी सांगितले की घटनेचा आणि गोळीबार करणाऱ्यांचा तपास सुरु आहे. प्रत्यक्षदर्शींची चौकशी देखील केली जाईल. एका आठवड्यात घडलेला हा दुसरा हल्ला आहे. या आधी 6 ऑक्टोबरला अमेरिकेच्या कॅनसास शहरात गोळीबाराचा प्रकार घडला होता. येथे बारमध्ये गोळीबार झाला होता, त्यात 4 जणांचा मृत्यू झाला होता. तर 5 जण गंभीर जखमी झाले होते.

Visit : Policenama.com

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like