क्रूरकर्मा हल्लेखोराने एकावेळी केले होते १७ FB Live

न्यूझीलंड : वृत्तसंस्था –  न्यूझीलंडच्या ख्राईस्टचर्च भागात असलेल्या एका मशिदीत अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात आतापर्यंत ४० जणांचा मृत्यू झाला आहे. एव्हढेच नाही तर हा हल्ला जेव्हा झाला त्या वेळेला बांगलादेशची क्रिकेट टीम यावेळी तेथे उपस्थित होती .

विशेष म्हणजे ज्याने हा हल्ला केला त्याने हल्ला करते वेळी फेसबुक लाईव्हचा वापर केला. त्यामुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. या हल्लेखोराने एकावेळी १७ फेसबुक लाईव्ह सुरु ठेवले होते. ब्रेंटन टॅरेंट असे या क्रूर हल्लेखोरांचे नाव आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की , ब्रेंटन टॅरेंट हा २८ वर्षाचा असून तो ऑस्ट्रेलियात वास्तव्याला आहे. या हल्लेखोराने डीन एवेन्यू भागात अल नूर मशिदीजवळ आपली कार पार्क केली. त्यानंतर मशिनगन घेऊन मशिदीत शिरला आणि मग अंधाधुंद गोळीबार केला. तो लष्काराच्या वेशात आला होता आणि मशिदीत जो दिसेल त्याला गोळ्या घालत होता.

हल्लेखोर हा हल्ला फेसबुकवरून लाईव्ह करत होता. या दरम्यान त्याने दोन मॅगझिन फायर केले होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि एकच खळबळ उडाली. त्यानंतर हा व्हिडीओ हटवण्यात आला. तसेच अन्य सोशल माध्यमांतून हा व्हिडीओ व्हायरल करू नये अशी विनंती देखील प्रशासनाकडून करण्यात आली आहे. दरम्यान , या हल्लेखोराने आणलेली गाडी ताब्यात घेण्यात आली आहे. गाडीमध्ये अनेक शस्त्रे होती ती जप्त करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
You might also like