‘कोरोना’मुक्त न्यूझीलंडमध्ये पुन्हा आढळले पॉझिटिव्ह रुग्ण

पोलिसनामा ऑनलाईन – न्यूझीलंडने काही दिवसांपुर्वी कोरोनामुक्त झाल्याची घोषणा केली होती. 8 जूनला अखेरचा रुग्ण बरा झाल्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लावलेले सर्व निर्बंध हटवण्यात येत असल्याचे न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा आर्डेन यांनी सांगितले होते. मात्रा, आता न्यूझीलंडमध्ये पुन्हा एकदा कोरोना व्हायरसने डोके वर काढले आहे. न्यूझीलंडमध्ये दोन नवीन कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत.

कोरोनामुक्त देश केल्यानंतर मागील 24 दिवसांमध्ये एकही कोरोनाची लागण झालेला रुग्ण न्यूझीलंडमध्ये आढळला नव्हता. पण, मंगळवारी(दि.16) देशात दोन नवीन रुग्ण आढळल्याची माहिती देण्यात आली आहे. दोन्ही रुग्ण ‘युके’मधून प्रवास करुन परतले आहेत.

परदेशात असलेले नागरिक न्यूझीलंडमध्ये परतल्यानंतर भविष्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू शकते असा इशारा पंतप्रधान जसिंडा आर्डेन यांनी दिला आहे. ‘नव्याने आढळलेले दोन रुग्ण युकेमधून प्रवास करुन परतले आहेत. दोघांशीही संपर्क साधण्यात आला आहे’, अशी माहिती न्यूझीलंडच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली. यापूर्वी, 8 जून रोजी कोरोनामुक्त झाल्याची माहिती देताना अखेरचा रुग्ण बरा झाला आणि आपण आता कोरोनामुक्त झालो हे कळल्यानंतर मी माझ्या घरात आपोआप थोड्यावेळासाठी डान्स केलाअशी प्रतिक्रिया जसिंडा आर्डेन यांनी दिली होती.