Coronavirus : ‘या’ पध्दतीनं ‘हा’ देश ‘कोरोना’मुक्तीकडे, जाणून घ्या

ऑकलंड : वृत्तसंस्था – संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात अडकले असताना, न्यूझीलंड या देशाची वाटचाल मात्र कोरोनमुक्तीकडे चालली आहे. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डेने या कोरोनाविरुद्ध लढाई जिंकण्याच्या मार्गावर आहेत.

न्यूझीलंडमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण २७ फेब्रुवारीला सापडला. त्यानंतर दोन महिन्याच्या काळात न्यूझीलंड प्रशासनाने नागरिकांच्या सहकार्यने कोरोनावर चांगले नियंत्रण प्रस्थापित केले आहे. सुमारे ५० लाख लोकसंख्येच्या न्यूझीलंडमध्ये आजतागायत १४७२ जण बाधित असून १९ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या दोन दिवसात न्यूझीलंडमध्ये बोटावर मोजण्याइतपत रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.पण आणखी काही काळ सोशल डिस्टिन्सिंग पाळावे लागणार असल्याचे म्हटले आहे. या निकषाच्या आधारावर येत्या काही दिवसांत व्यापाराला परवानगी दिली जाणार आहे.

जवळपास आम्ही हि लढाई जिंकल्याचे प्रतिपादन न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आंद्रे यांनी केले आहे , नेमके कोणते मुद्दे या देशाचे सर्रास ठरले कोरोनमुक्तीच्या लढाईत जाणून घेऊयात.

१) सर्वप्रथम न्यूझीलंडचे भौगोलिक स्थान

२) योग्यवेळी अचूक निर्णय या देशाने घेतले. त्यामुळे वेळीच कोरोनाला जास्त पसरण्यापासून रोखता आतर.
३) पंतप्रधान जेसिंडा आर्देर्न यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि दमदार नेतृत्व
४) आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांचे कमी प्रमाण

हे चार मुद्दे न्यूझीलंडला कोरोनमुक्ती करण्यासाठी सकस ठरले

आता जाणून घेऊया न्यूझीलंड मधील कोरोना रुग्णांची संख्या

  • – २८ फेब्रु.ला पहिला रुग्ण आढळला
    – १४ मार्च रोजी सहा रुग्ण. दोन आठवडे क्वारंटाइनची सक्ती
    – १९ मार्च रोजी परदेशी प्रवाशांना देशात बंदी, २५ रुग्ण सापडले
    – २३ मार्च रोजी देशात लॉकडाउनची घोषणा

न्यूझीलंड मध्ये ज्यावेळी कोरोनाचे रुग्ण आढळून आले त्यावेळी ६ महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले
१) सीमा सील केल्या
२) परदेशातून आलेले दोन आठवडे क्वारंटाइन
३) न्यूझीलंडच्या नागरिकांनाच परत येण्यास मुभा
४) परदेशी नागरिकांना २० मार्चपासूनच बंदी घातली
५) सोशल डिस्टिन्सिंगचे काटेकारपणे पालन
६) नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात चाचण्या

देशातील आर्थिक स्थैर्य टिकण्यासाठी न्यूझीलंडच्या पंतप्रधांणांनी कोणते अचूक निर्णय घेतले जाणून घेऊयात

१) पंतप्रधान जेसिंडा आर्देर्न यांच्याकडून मंत्र्यांच्या वेतनात २० टक्के कपात. ही कपात सहा महिने राहणार
२) दहा लाख कामगारांच्या वेतन सुरक्षिततेसाठी २.८ अब्ज डॉलरची तरतूद
३) कोरोनाचा सामना करण्यासाठी दहा अब्ज डॉलरची तरतूद
४) व्यवसाय कररचनेत बदल. रोकड उपलब्धता, गुंतवणुकीला चालना मिळावी, वर्क फ्रॉम होमला पाठिंबा राहवा यासाठी आरखडा.
५) देशात नव्या उपक्रमासाठी ५० दशलक्ष डॉलरची तरतूद

अशाप्रकारे न्यूझीलंडने वेळीच उपाययोजना करून कोरोनाचा प्रसार आटोक्यात आणला आहे. सद्य स्थितीत हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच कोरोनाबाधित रुग्ण न्यूझीलंड मध्ये आहे.