लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या आरोग्यमंत्र्यांना मिळाली शिक्षा, काढून घेतला कॅबिनेटचा दर्जा

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोना व्हायरसमुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी न्यूझीलंडचे आरोग्यमंत्री डेव्हिड क्लार्क यांना राजीनामा देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. देशाचे पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी मंगळवारी यासंदर्भात माहिती दिली. पंतप्रधान म्हणाले की, सामान्य परिस्थितीत त्यांनी आरोग्यमंत्री डेव्हिड क्लार्क यांना पदावरून काढून टाकण्यात आले असते पण सध्या त्यांना डिमोट करण्यात आले आहे.

माहितीनुसार, लॉकडाउन आणि सामाजिक अंतरांच्या नियमांचे उल्लंघन करत त्यांनी आपल्या कुटुंबास कारमधून समुद्रकिनार्‍यावर नेण्याचा प्रयत्न केला होता. पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न वेलिंग्टनमध्ये म्हणाले की, आरोग्यमंत्र्यांनी जे काही केले ते चुकीचे होते. त्यामुळे क्लार्क यांच्याकडून मंत्रिमंडळातील पद काढून घेण्यात येत आहे. त्यांना सहाय्यक अर्थमंत्री पदापासूनही वेगळे केले आहे. पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न म्हणाले की, त्यांना चांगल्याची आशा आहे आणि न्यूझीलंडलाही अधिक चांगले हवे आहे.

दुसरीकडे, क्लार्कने आपल्या स्पष्टीकरणात म्हटले की, त्याने अत्यंत मूर्खपणाचे वर्तन केले आहे. लोकांची नाराजी त्यांना समजते आहे. दरम्यान, ५० लाख लोकसंख्या असलेल्या न्यूझीलंडमध्ये मार्चपासून चार आठवड्यांच्या लॉकडाउन सुरू आहे.