न्यूझीलंडला जाऊन शूटिंग करा, ‘या’ अभिनेत्याचा बॉलिवूडला सल्ला

पोलिसनामा ऑनलाईन टीम –   कोरोनाचे संक्रमण नियंत्रणात आलेले नाही. त्यामुळे लॉकडाउनचा काळही काहीसा लांबवला जात आहे. मात्र त्यामुळे चित्रपट उद्योगाचे तीनतेरा वाजले आहेत. दररोज लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. अनेक लहानमोठे कलाकार बेरोजगार झाले आहेत. व्यवसाय पुर्वपदावर आणण्यासाठी निर्मात्यांनी चित्रीकरण सुरु करण्याची परवानगी सरकारकडे मागितली आहे. परंतु अशा विनंती करण्यापेक्षा थेट न्यूझीलंडला जाऊन चित्रीकरण करावे असा सल्ला अभिनेता कमाल खानने बॉलिवूडला दिला आहे.

जगातील पहिला कोरोना फ्री न्यूझीलंड हा आहे. त्यामुळे बॉलिवूड चित्रपट निर्मात्यांनी मुंबईमध्ये चित्रीकरणाची वाट पाहाण्यापेक्षा थेट न्यूझीलंडला जाऊन काम सुरु करावे, तिथे मुंबईपेक्षा चांगले वातावरणही तुम्हाला मिळेल. अशा आशायाचे ट्विट कमाल खानने केले आहे.कमाल खान उर्फ केआरके वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहे. ते सातत्याने विविध क्षेत्रातील सेलिब्रिटी आणि राजकारणी मंडळींवर टीका करत असतात. यावेळी त्यांनी कोरोनाचे निमित्त साधून बॉलिवूड निर्मात्यांना सल्ला दिला आहे. त्याचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकर्‍यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जाणांनी या ट्विटसाठी त्याची खिल्ली देखील उडवली आहे.