राष्ट्रवादीच्या ‘या’ ज्येष्ठ नेत्यावर काँग्रेसच्या थोरात यांची जाहीर नाराजी ; ‘त्यांची’ दुराग्रही भूमिका चुकीची : थोरात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांच्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. निळवंडे कालव्याच्या प्रश्नावर त्यांनी पिचड यांची राजकीय हेतूने सुरू असलेली दुराग्रही भूमिका चुकीची असल्याचा आरोप थोरात यांनी केला आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीतील दोन्ही नेत्यांतील जाहीर मतभेद आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

याबाबत जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात थोरात म्हणाले की, आम्ही ज्येष्ठ नेते म्हणून पिचडांचा कायमच आदर केला. मात्र निळवंडे कालव्यांच्या संदर्भाने त्यांनी घेतलेली भूमिका चुकीची आहे. अगोदरच शासकीय अनास्थेमुळे पाच वर्षे रखडलेल्या कालव्यांना पिचडांनी राजकीय हेतूने विरोध करू नये. दुष्काळी जनतेच्या भावना तीव्र आहेत.

भूमिगत कालवे होणारच नाही, त्यासंदर्भातील भूमिका केंद्र सरकारने स्पष्ट केली आहे. त्यामुळे अकोल्यातून सुरू असलेला विरोध हा राजकीय भावनेतून सुरू आहे. निळवंडे प्रकल्पच मुळात दुष्काळी भागाला पाणी मिळावे, यासाठी उभारला गेला आहे. सन 1991 पासून निळवंडे प्रकल्पासाठी अकोले आणि संगमनेरने एकत्रित प्रयत्न केले आहेत, असे असताना अकोले तालुक्यात होणाऱ्या कालव्यांना विरोध करून पिचड चुकीचे वागत आहे.

…तर जनता उद्रेकाच्या तयारीत

‘निळवंडे कालवे हे दुष्काळी भागाच्या भावनेचा विषय आहे आणि तेथील जनतेच्या भावना तीव्र आहे. हात तोंडाशी आलेला पाण्याचा घास हिरावून घेण्याचा कोणालाही अधिकार नाही. दुष्काळी भागातील जनता उद्रेकाच्या तयारीत आहे. त्यामुळे अकोले येथून सुरू असलेले कालव्यांचे राजकारण बंद करावे, असेही आवाहन थोरात यांनी केले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

‘बल्जिंग डिस्क’ आजार माहीत आहे? जाणून घ्या कारणे

गरोदरपणा नंतरचा लठ्ठपणा नको ? मग ‘हे’ पाणी प्या

‘Sexsomnia’ने ग्रासित लोक झोपेमध्येही ‘हे’ करतात

अंघोळ करताना तुम्ही ‘या’ चूका तर करत नाही ना ?