Newborn Baby Died | Australia मध्ये Doctors च्या निष्काळजीपणामुळे गेला नवजात बाळाचा जीव; Oxygen च्या ऐवजी दिला Laughing Gas

सिडनी : वृत्तसंस्था हॉस्पिटल (Hospital) मध्ये निष्काळजीपणामुळे मृत्यूच्या घटना नेहमीच ऐकायला मिळतात, परंतु ऑस्ट्रेलिया (Australia) च्या सिडनीत निष्काळजीपणाचे एक असे प्रकरण समोर आले आहे ज्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे. येथे डॉक्टरांनी (Doctors) नवजात बाळाला ऑक्सीजन (Oxygen) च्या ऐवजी लाफिंग गॅस (Laughing Gas) चढवला, ज्यामुळे त्याचा मृत्यू (Newborn Baby Died) झाला. जन्मानंतर ताबडतोब या मुलास श्वास घेण्यास त्रास होत होता. यासाठी त्यास ऑक्सीजन सपोर्ट दिला जाणार होता, परंतु हॉस्पिटल स्टाफने चुकीने लाफिंग गॅस चढवला. newborn baby died after being given laughing gas instead of oxygen in australia

India मधील केसचा केला अभ्यास

‘मिरर’च्या रिपोर्टनुसार, हॉस्पिटल कर्मचार्‍यांनी (Hospital Staff) बाळाला ऑक्सीजनच्या ऐवजी नायट्रस ऑक्साईड (Nitrous Oxide) दिला, ज्यामुळे त्याने काही वेळातच प्राण सोडला.
चौकशीत ही गोष्ट समोर आली आहे की, सुमारे एक वर्षापासून हॉस्पिटलमध्ये ऑक्सीजनच्या ठिकाणी लाफिंग गॅस ठेवला होता, कुणाचेही याकडे लक्ष गेले नाही.
हा निष्काळजीपणा तेव्हा समजला जेव्हा वरिष्ठ डॉक्टरांच्या एका टीमने भारतात घडलेल्या अशाच प्रकारणाचा अभ्यास केला.

Caesarean ने झाला होता जन्म

ही घटना सिडनीच्या बॅकस्टाउन-लिडकोम्बे हॉस्पिटलच्या ऑपरेशन थिएटरमध्ये 13 जुलै, 2016 ला झाली होती. सध्या यावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
पीडित पक्षाच्या वकिलांनी Lidcombe Coroners Court ला सांगितले की, युसूफ आणि सोन्या (डेपूर) यांच्या नवजात बाळाचा मृत्यू डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे झाला.
सोन्याने ऑपरेशनद्वारे बाळाला जन्म दिला होता.
याच कारणामुळे आणखी एका बाळाचा मृत्यू याच हॉस्पिटलमध्ये यापूर्वी झाला होता.

 

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Builder Sanjay Gaikwad | कल्याण येथील प्रसिद्ध बिल्डर संजय गायकवाड यांच्याविरोधात वीज चोरीप्रकरणी FIR 

Atal Pension Yojana | केवळ 7 रुपये प्रतिदिवस गुंतवणुकीने दर महिना मिळेल 5,000 रुपयांचा फायदा, फक्त करा ‘हे’ काम

Gold Price Today | सोनं पुन्हा 49 हजारपर्यंत, चांदी मात्र स्थिर; जाणून घ्या आजचे दर