लासलगाव रेल्वे स्थानकावर आढळले 7 दिवसाचे अर्भक

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – लेक वाचवा… लेक वाढवा… ही जनजागृती खरोखर कुठे कमी पडते आहे हे आज जाणवले. लासलगांव रेल्वे स्थानकावर गुरुवारी रात्री ९ वाजेच्या दरम्यान ७ दिवसाच्या मुलीला बेवारस टाकून दिल्याची घटना उघडीस आली.

नंदीग्राम एक्स्प्रेसने उतरलेले पंकज पाठक यांना बाळा चा रडन्याचा आवाज आला. बाकड्यावर ७ दिवसांची मुलगी टाकून दिल्याचे त्यांना दिसले. रेल्वे पोलिस समाधान गांगुर्ड यांनी घटना स्थळी घाव घेतली. रेल्वेचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक महेश महाले यांनी मुलीला लासलगाव रेल्वेस्थानकावर गुरुवारी ताब्यात घेऊन लासलगाव येथील श्री संत जनार्दन स्वामी अनाथआश्रमाचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप गुंजाळ व संगीता गुंजाळ यांच्याशी संपर्क साधून मुलीला लासलगाव ग्रामीण रुग्णालयात आणले. डॉ. बाळकृष्ण हिरे, परिचारिका सोनवणे व दिवेकर यांनी मुलीवर उपचार केले. तिची प्रकृती चांगली असून अनाथ आश्रमाच्या संचालिका गुंजाळ यांनी मुलीला आईची माया दिली.

गोड, गोंडस, गुटगुटीत, अत्यंत देखणी मुलगी टाकून आई-वडिल कसे निघून जाऊ शकतात ? हा प्रश्न सर्वांनाच खूप सतावत होता. संगीता गुंजाळ यांच्या मांडीवर अगदी गुपचूप पडून राहिलेली ही गोंडस कन्या खरोखर तिची काय चूक असेल कि तीला आज रेल्वे स्टेशनवर सोडून तिच्या आई वडिलांना पळून जावे लागले असेल.

फक्त ती एक मुलगी एवढेच ना…
सरकार यासंदर्भात खुप जनजागृती करतंय, मात्र तरीही असे प्रकार घडतच आहे. मुलींच्या बाबतीत असे का होते आहे, हाच मोठा प्रश्न जाणवतोय.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like