Thane : 15 तासांपूर्वी जन्मलेल्या नवजात अर्भकाला कोरोनाची बाधा; आईची कोरोना टेस्ट मात्र निगेटिव्ह

पालघर : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना विषाणूच्या विळख्यापासून कोणच सुटू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झालीय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अनेक लोकांना कोरोना झाला आहे. तर एक चिंताजनक बाब म्हणजे. आता पालघर येथील एका नवजात अर्भकाला newborn baby कोरोनाची बाधा झाली आहे. तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका हा लहान मुलांना बसण्याची भीतीही वर्तवली जाते. अर्भकाला कोरोना झाल्याने सर्वत्र चिंता व्यक्त होत आहे.

12 वी परीक्षांचा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता, केंद्रीय शिक्षणमंत्री AIIMS मध्ये दाखल

अधिक माहितीनुसार, पालघरमधील सफाळे येथील टेकरीचा पाडा मधील रहिवाशी असलेल्या एका नवजात अर्भकाला newborn baby कोरोना झाला आहे. बाळाच्या जन्मानंतर १५ तासाने त्याची अँटिजन रॅपिट चाचणी केली गेली. त्यावेळी त्याच्या आईची देखील टेस्ट केली. यावेळी बाळाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर, बाळाच्या आईची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.

कोरोनावर चमत्कारी औषधाचा दावा करणाऱ्या माजी मुख्याध्यापकाचा कोरोनानेच मृत्यू

या दरम्यान, कोरोनाची बाधा झालेल्या त्या अर्भकाची प्रकृती स्थिर असून त्याला पुढील उपचारासाठी जव्हार येथील रुग्णालयात दाखल केले गेले. बाळाच्या आईवर पालघर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्यान, बाळाची प्रकृती स्थिर असली तरी काही गुंतागुंत असल्याने त्यावर जव्हार रुग्णालयात उपचार देणे सोयीचे जाईल असे तेथील आरोग्य अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

READ ALSO THIS :

खुशखबर ! 18 ते 40 वर्षे वयोगटातील 10 वी पास उमेदवारांना पोस्टाच्या महाराष्ट्र विभागात नोकरीची सुवर्णसंधी, मुलाखतीविना 2428 पदांसाठी भरती; जाणून घ्या प्रक्रिया

 

लाल, गोड टरबूज ओळखण्याच्या अनोख्या युक्त्या; तात्काळ समजेल फळाच्या आतमधील परिस्थितीबाबत, जाणून घ्या

2013 च्या पोलीस उपनिरीक्षक अहर्ता परिक्षेतील 619 अंमलदारांना PSI पदी बढती

 

सकाळी उठल्यानंतर दररोज बडीशेपचे पाणी प्या, नक्की वजन होईल कमी; जाणून घ्या पाणी पिण्याची पध्दत

 

दिलासादायक ! दिवसभरात देशात नव्या कोरोनाबाधितांपेक्षा दुप्पट रुग्ण कोरोनामुक्त