दुर्दैव ! महिला दिनीच नवजात चिमुकलीला पार्किंगमध्ये सोडलं

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – जगभरात आज जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो आहे. मात्र महिलादिनीच एका नवजात चिमुकलीला अज्ञातांनी पार्किंगमध्ये सोडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नाशिकच्या पांडव लेणीच्या पार्किंग समोर नवजात बालक सापडले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, आज सकाळच्या सुमारास पांडव लेण्याच्या परिसरातील पार्किंगमध्ये हे नवजात बालक सर्वप्रथम स्थानिकांना आढळले. त्यानंतर यासंदर्भातली माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तातडीने हे बाळ ताब्यात घेऊन तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या बाळाची नाळ देखील अजून सुकलेली नाही.अशा अवस्थेत या गोंडस मुलीला पाहून कोणाचेही हृदय हेलावेल. पण दुर्दैवाची बाब अशी की वर वर बेटी बचाओ चा नारा किती जरी दिला तरी अजून बेटी बचाओ चा विचार मात्र रुजला नाहीच असे म्हणायला हवे. आज महिलांचा सन्मान करण्याचा दिवस आहे. त्यात अशी घटना घडल्यामुळे आपला देश खरचं पुढारलेल्या विचारांचा आहे का असा प्रश्न समोर येतो.

दरम्यान, हे बाळ कुठून आले. या बाळाला कोणी पार्किंगमध्ये सोडले याची माहिती अद्याप मिळालेली नाही. परंतु पोलीस यासंदर्भात अधिक तपास करीत आहेत.  या चिमुकलीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे.

ह्याहि बातम्या वाचा –

“अभिनंदन वर्धमान यांना परमवीर चक्र देण्यात यावा”

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांनो सावधान

बोलेरोतून गावठी दारूची वाहतूक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

हडपसर ते वाघोली चौपदरीकरणास मंजुरी