दुर्दैवी : ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दुचाकीचा भीषण अपघात ; नवदाम्पत्याचा मृत्यू

परभणी : पोलिसनामा ऑनलाईन – भीषण अपघातात नवदाम्पत्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जीपला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दाम्पत्य रस्त्यावर पडले. त्यानंतर मागून येणारी भरधाव जीव त्यांच्या डोक्यावरुन गेली. राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली आहे. मानवत जवळील रत्नापूर शिवारात हा भीषण अपघात झाला. ही घटना दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे

पाथरी तालुक्यातील पोहेटाकळी गावातील भागवत गोंगे आणि आरती गोंगे हे नवविवाहित दांपत्य दुचाकीवरून मानवतच्या दिशेने जात होते. मानवत जवळील रत्नापूर शिवारात दुचाकीवरून जात असताना त्यांच्या भीषण अपघात झाला. रस्त्यावरुन जात असताना समोरुन जात असलेल्या जीपला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात त्यांची गाडी स्लीप होऊन ते खाली पडले. त्यानंतर मागून भरधाव येणारी जीप त्यांच्यावर चढली. या भीषण अपघातात जीपचे चाक पत्नीच्या डोक्यावरुन गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला, तर जखमी पतीनेही जीव सोडला.

या दाम्पत्याचा अवघ्या तीन महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून, तीन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या नवदाम्पत्याच्या अशा अचानक जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.जीपचालक फरार झाला असून ट्रकचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –