नवविवाहीत पोलिस दाम्पत्याचा अपघात ; पोलिस पतीचा मृत्यू तर पत्नी जखमी

तिवसा (अमरावती) : पोलीसनामा ऑनलाइन – नवविवाहीत पोलीस दांपत्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात पोलीस पतीचा जागीच मृत्यू झाला. तर पोलीस पत्नी या अपघातात गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिवण गावानजीक बुधवारी घडली.

निलेश विठ्ठलराव ठाकरे (वय-३० रा. सुरवाडी ता. तिवसा) असे मृत्यू झालेल्या पोलीसाचे नाव आहे. तर पूनम निलेश ठाकरे (वय-२७) असे जखमी झालेल्या पत्नीचे नाव आहे. निलेश ठाकरे हे गोंदिया येथे राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १५ मध्ये कार्य़रत होते. तर पूनम ठाकरे या नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल पदावर कार्यरत आहेत. १६ मे रोजी तिवसा येथे दोघांचा विवाह झाला होता.

नवदांपत्य बुधवारी अमरावती येथे गेले होते. पत्नीला घेऊन ते रात्री दुचाकीवरून (एमएच २७ सीएच ८९०३) सुरवाडी येथे जात होते. शिवण गावानजीक अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये निलेशचा जागीच मृत्यू झाला. तर पूनम जखमी झाली. जखमी पूनमवर तिवसा ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी अमरावती येथे हलविण्यात आले आहे. त्यांच्या दुचाकीला धडक देणाऱ्या वाहनाचा शोध पोलीस घेत आहेत. घटनेची माहिती मिळताच नांदगाव पेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

सिने जगत –

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

अभिनेत्री उशोशी सेनगुप्‍ता म्हणाली, गप्प बसली असते तर झाली नसती ‘छेडछाड’ ; ७ गुंडाना अटक

‘माता-पिता की चरणों में स्वर्ग’ म्हणणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘वाढीव’ लुक पाहिलात का ?

 

You might also like