‘सिंदूर-चुडा’ घालून पतीसोबत एअरपोर्टवर खास अंदाजात दिसली पूनम पांडे ! (फोटो)

पोलिसनामा ऑनलाइन – हॉट आणि बोल्ड फोटो तसेच व्हिडीओंमुळं कायमच धुमाकूळ घालणारी आणि नुकतीच विवाहबद्ध झालेली अभिनेत्री पूनम पांडे बुधवारी एअरपोर्टवर स्पॉट झाली. यावेळी ती पती सॅम बॉम्बे सोबत दिसली. पतीचा हात पकडत ती पोज देत होती.

एअरपोर्टवर पूनम हातात चुडा, सिंदूर आणि मंगळसूत्र फ्लाँट करताना दिसली. लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं क्रीम कलरचा क्रॉप टॉप आणि व्हाईट ट्राऊजर घातली होती. या लुकमध्ये ती पूनम खूपच बोल्ड आणि स्टनिंग दिसत होती.

पूनमचा पती सॅम बॉम्बेच्या लुकबद्दल बोलायचं झालं तर त्यानं ब्लॅक शर्ट आणि डेनिम जीन्स घातली होती. सोबत त्यानं ब्लॅक ब्लेझरही घातलं होतं. पूनम आणि सॅम एकत्र खूप छान दिसत होते. त्यांचे काही फोटो सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत.

पूनम आणि सॅम यांच्या लग्नाबद्दल बोलायचं झालं तर 1 सप्टेंबर 2020 रोजी सॅम आणि पूनम यांनी प्रायव्हेट सेरेमनीत लग्न केलं. चाहत्यांना सरप्राईज देत त्यांनी सोशलवर अनेक फोटो शेअर केले होते. 27 जुलै रोजी लॉकडाऊनमध्ये त्यांनी साखरपुडा केला होता.

पूनमच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं नशा, द जर्नी ऑफ कर्मा आणि आ गया हिरो अशा अनेक सिनेमात काम केलं आहे.