धक्कादायक ! नव विवाहितेला हायपाय बांधून जाळले, एकाच घरातील दुसरी घटना

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – घरगुती कारणावरून नवविवाहीतेला हातपाय बांधून जिवंत जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा प्रकार दोन दिवसांपूर्वी घडला असून महिलेचा उपचारादरम्यान आज (बुधवार) मृत्यू झाला. दरम्यान, तहसीलदार आणि पोलिसांनी तिचा जबाब नोंदवून घेतला असून तिने ‘मला सासरच्यांनी जाळले’ असे जबाबात म्हटले आहे. पोलिसांनी पती आणि सासूला अटक केली आहे.

ऋतुजा भास्कर बिटे (वय-19) असे मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पती भास्कर प्रल्हाद बिटे व सासू रुक्मीन प्रल्हाद बिटे या दोघांना वडवणी पोलिसांनी अटक आहे. त्यांच्यावर 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ऋतुजा हिचा विवाह वडवणी तालुक्यातील साळींबा येथे सहा महिन्यापूर्वी झाला होता. लग्नानंतर काही दिवसांनी सासरच्यांनी तिचा छळ करण्यास सुरुवात केली. तिचा शारिरीक आणि मानसिक त्रास देण्यात येत होता.

यातूनच सासूच्या सांगण्यावरून पतीने अंगावर रॉकेल ओतून तिला जिवंत पेटवून दिले. यामध्ये गंभीररित्या भाजलेल्या ऋतुजावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, आज पहाटे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी पती आणि सासूला अटक केली आहे. काही वर्षापूर्वी घरातील मुलगी प्रियकरासोबत बीड येथे चित्रपट पहाण्यासाठी गेली म्हणून तिच्या वडिलांनी तिला मारुन टाकले होते. याप्रकरणात वडिलांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि आता याच घरातील सुनेला पती आणि सासूने जिवंत जाळले.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like