मोबाईलचा अतिरेक ; मोबाईलवर बोलताना नवविवाहितेचा जिन्यावरुन पडून मृत्यू

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – मोबाईलच्या अतिरेकामुळे अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. मोबाईलवर बोलत असताना काहींना भानही रहात नाही त्यामुळे प्रसंगी जीव ही गमवावा लागतो. मोबाईलवर बोलत जिना उतरताना तोल जाऊन पडल्यामुळे एका नवविवाहीत तरुणीला आपला जीव गमवावा लागल्याची घटना औरंगाबाद शहरामध्ये घडली आहे. ही घटना गंगापूर जहाँगिर येथे घडली.

मुस्कान रामअवतार कुर्मी (वय-२५) असे मृत्यू झालेल्या नवविवाहितेचे नाव आहे. मुस्कान फोनवर बोलत जिना उतरत होती. त्यावेळी तीचा तोल गेल्याने ती खाली कोसळली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मुस्कानला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मंगळवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मुस्कान आणि रामअवतार कुर्मी हे मुळचे मध्यप्रेदेश मधील रहिवाशी आहेत. त्यांचा तीन महिन्यापूर्वी प्रेमविवाह झाला होता. रामअवतार हा कामाच्या शोधात औरंगाबादमध्ये आला होता. नवविवाहीत जोडपे जहाँगिर येथे एका भाड्याच्या खोलीत राहत होते. रामअवतार हा एमआयडीसीमध्ये एका खसगी कंपनी कामाला लागला होता.

५ जून रोजी रात्री आठच्या सुमारास मुस्कान नातेवाईकांसोबत फोनवर बोलत जिना उतरत होती. त्यावेळी तिचा पाय निसटल्याने ती जिन्यावरून खाली कोसळली. मुस्कानला तातडीने घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तिच्या डोक्याला मार लागल्याने तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पुढील तपास चिकलठाणा पोलीस करीत आहेत.

आरोग्य विषयक वृत्त –

#KuToo : हाय हिल्स विरोधात जपानमधील महिलांची मोहीम

माणसाच्या पोटात ‘मायक्रोप्लास्टिक’चे कण जाण्याचे प्रमाण चिंताजनक

त्वचेचा ‘ग्लो’ वाढवायचाय ? ‘या’ उपायांनी दिसेल ७ दिवसात परिणाम

नपुंसकता आणि कमजोरी नष्ट करते ‘खारीक’