राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ट्रस्टला दहशतवाद्याकडून २ कोटीचे डोनेशन : डॉ. अशोक विखे पाटील यांचा आरोप

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू डॉ. अशोक विखे पाटील यांनी खळबळजनक आरोप केला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रवरा मेडिकल ट्रस्टला एका दहशतवाद्याने दोन कोटी रुपयांचे डोनेशन दिले आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याच भावाने खळबळजनक आरोप केल्याने राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

डॉ. अशोक विखे पाटील म्हणाले, जेव्हापासून राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्षनेते बनले तेव्हापासून त्यांचे भाजपसोबत साटेलोटे आहे. २०१३-१४ मध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रवरा मेडिकल ट्रस्टला दोन कोटी रुपये डोनेशन मिळाले. हे डोनेशन झाकीर नाईक नावाच्या दहशतवाद्याकडून मिळाल्याचा खळबळजनक आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू डॉ. अशोक विखे पाटील यांनी केला आहे.

कोण आहे झाकिर नाईक
जुलै २०१६मध्ये बांगलादेशची राजधानी ढाक्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर झाकीर नाईक एनआयएच्या रडारवर आला होता. झाकीर नाईकच्या भाषणाने प्रेरित होऊन आम्ही हा हल्ला केल्याचे या हल्ल्यातील दहशतवाद्यांनी सांगितले होते. दरम्यान, झाकीर नाईक १ जुलै २०१६ रोजी भारतातून फरार झाला. या सगळ्या पार्श्वभूमीवर १८ नोव्हेंबर २०१६ रोजी एनआयएने मुंबईत झाकीर नाईकविरोधात गुन्हा दाखल केला होता. नाईकविरोधात देशद्रोह, दहशतवादी बनण्यासाठी प्रेरित करणे, यासह अनेक गंभीर आरोप आहेत.