2019 Cricket World Cup : वर्ल्ड कपमध्ये भारतासाठी ‘हे’ दोन फलंदाज ठरू शकतात डोकेदुखी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत अनेक विक्रमांना गवसणी घातली जाऊ शकते. तसेच अनेक जुने विश्वविक्रम मोडून नवीन विक्रम होऊ शकतात. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वर्ल्डकप जिंकेल अशी खात्री संपूर्ण भारतीयांना आहे. मागील वर्षभरात भारतीय संघाने परदेशात चांगली कामगिरी केली असल्याने क्रिकेट प्रेमींना भारतीय संघ यंदाचा वर्ल्डकप जिंकेल असा विश्वास आहे.

भारतीय संघ वर्ल्ड कप स्पर्धेत ५ जून रोजी दक्षिण अफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. पण वर्ल्ड कपमध्ये भारतासाठी दोन फलंदाज डोकेदुखी ठरू शकतात असे स्विंग गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने म्हटले आहे. नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्ये ऑस्ट्रेलियाचा फलंदाज आणि ऑरेंज कॅप विजेता डेव्हिड वॉर्नर हा धोकादायक फलंदाज ठरू शकतो. वॉर्नर याच्यावर एक वर्षाच्या बंदी घातली होती. यानंतर तो प्रथमच आयपीएलमध्ये खेळला. त्याने धावांची टांकसाळच उघडली. त्यामुळे तो भारतासाठी सर्वाधिक डोकेदुखी ठरु शकतो असे भुवनेश्वरला वाटते.

भुवनेश्वरने वॉर्नर बरोबरच वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज आंद्रे रसेल देखील भारताची डोकेदुखी ठरू शकतो असे म्हटले आहे. कारण रसेलकडे एकतर्फी सामना फिरवण्याची शमता आहे. त्याच्या स्फोटक फलंदाजीमुळे समोरच्या संघाची कशी अवस्था होते ते आयपीएलमध्ये दिसून आले. त्यामुळे हे दोघे भारतासाठी मोठी डोकेदुखी ठरू शकतात.”