लवकरच बंद होणार ‘हे’ ५ टिव्ही शो

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आजकाल प्रत्येक टिव्ही शो चे दिवाने आहे. टिव्ही शो मध्ये स्टारसोबत मोठे-मोठे बॉलिवूडचे स्टार दिसून येतात. या दरम्यान एक गोष्ट समोर आली आहे. सुत्रांनी माहिती दिल्यानूसार, लवकरच काही टिव्ही शो बंद होणार आहे. याचा धक्का प्रेक्षकांना नक्कीच बसणार आहे. हे शो बंद होण्याचे कारण समोर आले काही शो टिआरपी न मिळाल्यामुळे बंद होत आहे तर काही शो त्यांच्या मर्यांदा संपल्यामुळे बंद होणार आहे. यामध्ये हे ‘पाच’ शो बंद होणार आहे.

१. नागिन ३ – यामध्ये सगळ्यात पहिला कलर्सवर चालु असलेला शो ‘नागिन ३’ २६ मे ला प्रसारित होणार आहे. यामध्ये सुरभि ज्योति, पर्ल पुरी आणि अनीता हसननंदानी मुख्य भूमिकेत आहे. आणि हा शो टीआरपी चार्टमध्ये प्रसिद्ध आहे. प्रेक्षकांनी या शो ला खुप प्रसिद्धी मिळाली आहे. हा शो मे मध्ये विस्तारित होऊन बंद होणार आहे.

२. कृष्णा चली लंडन – स्टार प्लसवरील ‘कृष्णा चली लंडन’ हा शो मागच्या वर्षी २१ मे ला लॉंन्च झाला होता. हा शो १४ जूनला बंद होणार आहे. यामध्ये मेघना चक्रवर्ती आणि करण वोहरा मुख्य भूमिकेत आहे. १७ जून पासून बिग बॉस १२ ची विजेती दीपिका कक्कड हीचा शो ‘कहां हम कहां तुम’ शो कृष्णा चली लंडनची जागा घेणार आहे.

३. आपके आ जाने से – झी टिव्हीवरचा शो ‘आपके आ जाने से’ ३१ मे ला बंद होणार आहे. ३१ मे ला या शोला १ वर्ष ४ महिने पुर्ण होणार आहे.

४. शादी के सियापे – अॅण्ड टिव्ही वरचा शो ‘शादी के सियापे’ या वर्षी १६ मार्चला लॉन्च झाला होता. आता लवकरच हा शो बंद होणार आहे.

५. विक्रम बेताल की रहस्य गाथा – अॅण्ड टिव्हीवरचा प्रसिद्ध शो ‘विक्रम बेताल की हसस्य गाथा’ या महिन्यात बंद होणार आहे. पुढच्या महिन्यात ‘जात ना पूछो प्रेम की’ शो सुरु होणार आहे.