भारतात 5000 आणि 10000 रुपयांच्या नोटा कधी छापल्या ? किती दिवस चालल्या ?, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिझर्व बँकेनं 1938 मध्ये पहिल्यांदाच 10,000 रुपयांच्या नोटा भारतात छापल्या होत्या. रिझर्व बँकेनं 1938 साली पहिल्यांदा पेपर करन्सी छापली होती जी 5 रुपयांची नोट होती. याच वर्षी 10 रुपये, 100 रुपये, 1,000 रुपये आणि 10,000 रुपयांच्या नोटाही छापल्या होत्या.

ten tousand note

परंतु 1946 साली 1,000 आणि10,000 च्या नोटा बंद करण्यात आल्या. यानंतर 1954मध्ये पुन्हा एकदा 1,000 आणि 10,000 रुपयांच्या नोटा छापण्यात आल्या. सोबतच 5,000 रुपयांचीही नोट छापण्यात आली. परंतु 1978 मध्ये या नोटा पूर्णपणे बंद करण्यात आल्या.

अर्थव्यवस्थेच्या चलनातून 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा परत घेणं हा सरकारचा एकमेव निर्णय नाही. याआधीही जानेवारी 1946 मध्ये आणि 1978 मध्ये 1,000 रुपयांच्या आणि याहून मोठ्या किंमतीच्या नोटा परत घेण्यात आल्या होत्या.

फेसबुक पेज लाईक करा –