सरकारी नोकरदारांसाठी गोड बातमी ! महागाई भत्यात 5 % वाढ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य सरकारने नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवडयात सरकारी कर्मचारी आणि अधिकार्‍यांना गोड बातमी दिली आहे. आता राज्य सरकारी कर्मचारी व अधिकारी यांना दि. 1 जुलै 2019 पासून 5 टक्के वाढीव महागाई भत्ता देण्यात येणार अहे. त्याबाबतचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
7th pay
7 व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्याचा दर हा 12 टक्क्यांवरून आता 17 टक्के असा करण्यात आला आहे. दरम्यान, सदरील महागाई भत्त्याची वाढ ही दि. 1 डिसेंबर 2019 पासून रोखीने देण्यात येणार आहे. 1 जुलै ते 30 नोव्हेंबर 2019 या 5 महिन्यांच्या कालावधीतील महागाई भत्याची थकबाकी ही नंतर स्वतंत्रपणे निर्णय घेऊन देण्यात येणार आहे.

नववर्षाच्या सुरवातीलाच सरकारने कर्मचारी आणि अधिकार्‍यांना गोड बातमी दिली आहे. महागाई भत्याची रक्कम देण्यासाठी तरतुदी आणि कार्यपध्दती ज्या प्रमाणे सध्या आहे त्याचप्रमाणे आगामी काळातही लागू करण्यात येणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/