‘या’ गोष्टींसाठी ‘आधारकार्ड’ची नसेल सक्ती, केंद्र सरकारच ‘विधायक’ मंजूर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आधार कार्डचा वापर ऐच्छिक असावा या विधेयकाला संसदेने मंजुरी दिली आहे. बँकेमध्ये खातं उघडताना किंवा नव्या मोबाइल कनेक्शनसाठी आधार कार्ड जोडणे आता सक्तीचे असणार नाही. कारण नुकतीच त्या संबंधित विधेयकाला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता तुमच्याकडे कोणीही आधार कार्डची बळजबरी करणार नाही.

आधार कार्ड बाबतचे विधेयक राज्यसभेत आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले. आधार कार्डचा गैरवापर झाल्या त्या व्यक्तीला १ कोटी रुपयांचा दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्याची तुरतूद असलेल्या या विधेयकाला याआधीच लोकसभेत ४ जुलैला मंजुरी देण्यात आली आहे. आधार आणि त्यासंबंधित कायदा विधेयक २४ जूनलाच लोकसभेमध्ये मांडण्यात आले होते.

लगेच मिळवा आधार कार्ड
आधार कार्ड अत्यंत महत्वाचे झाले आहे. अनेक ठिकाणी आधार कार्ड लिंक करावे लागत असल्याने त्याचा वापर वाढला आहे. पण हे आधार कार्ड हरवल्यास आता चिंता करण्याची गरज भासणार नाही. यासाठी नवी सेवा UIDAI ने उपलब्ध करुन दिली आहे. यात तुम्ही अगदी काही रुपयात आधार कार्डची री प्रिंट काढू शकतात. यासाठी तुम्हाला UIDAI च्या www.uidai.gov.in या वेबसाइटवर जावे लागेल. तुम्ही तुमचे आधार कार्ड यावरुन पुन्हा मिळवू शकतात. अनेकांचे मोबाईल नंबर देखील आधार कार्डला लिंक नाहीत, ते देखील यासाठी अर्ज करु शकतात.

असे मिळवा काही मिनिटात आधार
UIDAI ने उपलब्ध करुन देण्यात आलेल्या वेबसाईटवर कोणीही फक्त ५० रुपयात आधार कार्डची री प्रिंट काढू शकतात. हे कार्ड पोस्टाने तुमच्या घरी येईल. आधार कार्ड री प्रिंट करण्यासाठी तुम्हाला आधार नंबर किंवा व्हर्चुअल नंबर माहित असणे आवश्यक आहे.

यासाठी तुमचा आधार काढताना असलेला मोबाईल नंबर रजिस्टर्ड असायला हवा, कारण री प्रिंट साठी आवश्यक असलेला OTP मोबाईलवर पाठवण्यात येतो. परंतु तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर्ड नसला तरी तुम्हाला अर्ज करण्याची सुविधा UIDAI ने उपलब्ध करुन दिली आहे.

उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी ७ उपाय

‘तळहात’ पाहून सुद्धा ओळखू शकता, तुम्हाला आहे कोणता आजार ?

‘या’ गोष्टींचे सेवन करणाऱ्या महिलांना कधीही होत नाही ‘ब्रेस्ट कॅन्सर’

रोज सकाळी ‘मनुक्यांचे पाणी’ प्या आणि मिळवा ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

रक्ताचा अभाव, कॅन्सरसारख्या गंभीर आजारांवर ‘पांढरा कांदा’ उपयोगी