अहमदनगर : राष्ट्रवादीकडून अभिषेक कळमकर रिंगणात ?

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे शहराचे आमदार संग्राम जगताप हे पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याने राष्ट्रवादीकडून माजी महापौर अभिषेक कळमकर यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता आहे. त्यांनीही उमेदवारीचे संकेत दिले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे काल जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांच्या मुलाखती दरम्यान तुरळक कार्यकर्ते व कमी इच्छुक दिसत होते. त्यामुळे मुलाखतीदरम्यान निरुत्साह जाणवत होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आ. वैभव पिचड आणि आ. संग्राम जगताप यांची गैरहजेरी प्रामुख्याने जाणवली.

नगर शहरातील इच्छुकांच्या मुलाखतीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर, माजी महापौर अभिषेक कळमकर हेही उपस्थित होते. त्यांना उमेदवारीबाबत विचारले असता त्यांनीही अर्ज जरी भरला नसला, तरी उमेदवारी करू शकतो, असे संकेत दिले आहेत.

कळमकर यांच्यासह राष्ट्रवादी युवा आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष किरण काळे हेही इच्छुक आहेत. काळे यांनी उमेदवारीसाठी अर्ज करून मुलाखतही दिली आहे. परंतु माजी महापौर अभिषेक कळमकर यांचे पारडे उमेदवारीसाठी जड राहून त्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडू शकते, अशी चर्चा आहे.

आरोग्यविषयक वृत्त –