धुळे : तीन वाहनांचा विचिञ अपघात, रिक्षाचा स्फोट 1 जण जागीच ठार 3 गंभीर

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – तालुक्यातील सुरत नागपूर महामार्गावरील अजंग गावाजवळ विचिञ अपघात आज सायंकाळच्यावेळी घडला. महामार्गावर ट्रक, रिक्षा, ट्रॉली यांच्यात धडक झाली. रिक्षाचा स्फोट झाला. रिक्षातील एक जण जागीच ठार तर तीन जण आगीत भाजले गेल्याने गंभीर जखमी झाले आहे. कोणाची ओळख अद्याप पटलेली नाही. या अपघातामुळे महामार्गावर वाहतूक ठप्प झाली आहे.

गावातील लोकांनी मदतीसाठी महामार्गावर धाव घेतली. आगीवर नियंञण मिळविण्यासाठी बादलीतून पाणी भरुन आणत आगीवर पाण्याचा मारा केला. काही वेळाने आग अटोक्यात आली.

अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल होण्यास खुप उशीर झाला. आगीत रिक्षा पुर्ण जळुन खाक झाली. चालकाची आगीत अडकुन जळुन मृत्यु झाला. मृत्यु हे दृश्य पहाताच काही नागरीकांना ञास झाला.
गावात या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. हि बातमी कळताच तालुका पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहे.

Visit : Policenama.com