..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी कॉलेज शेजारील कचरा कुंडीची तक्रार थेट युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे केली. त्यानंतर कार्यक्रम आटोपताच ठाकरे यांनी राधाबाई काळे महाविद्यालयातील कचराकुंडीकडे धाव घेतली. ठाकरे यांच्या आदेशानंतर महापालिका आयुक्तांनी तातडीने साफसफाईचे काम हाती घेतले.

युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी माऊली सभागृहात आज महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. रयत शिक्षण संस्थेच्या राधाबाई काळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी युवा संवाद कार्यक्रमांत कॉलेजशेजारील कचराकुंडी मध्ये मेलेल्या जनावरांचे मांस आणून टाकले जात असल्याची तक्रार युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे केली. त्यानंतर कार्यक्रम संपल्यानंतर तातडीने आदित्य ठाकरे यांनी राधाबाई काळे महाविद्यालय येथे जाऊन पाहणी केली. तसेच महानगरपालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांना याबाबत सूचना करून तातडीने या कचराकुंडी बाबत आणि स्वच्छतेबाबत कारवाई करावी, असेही सांगितले. त्यामुळे शरद पवार यांच्या अधिपत्याखाली असलेल्या रयत शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांच्या मदतीला आदित्य ठाकरे धावून आले असच काहीसं चित्र दिसले.

ठाकरे यांनी आदेश देताच महापालिका प्रशासनाने तातडीने कचऱ्याची साफसफाई सुरू केली.

आरोग्यविषयक वृत्त –