मुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्रीपदाचा विषय माझ्यासमोर नसून महाराष्ट्र घडवायला मी निघालेलो आहे. जे लोक माझ्या मुख्यमंत्रीपदाबाबत बोलत आहेत. त्यांचे माझ्यावर प्रेम असल्याने बोलत असतील, असे वक्तव्य युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या प्रश्नावर बोलताना केले.

आदित्य ठाकरे यांची जनसंवाद यात्रा सुरू आहे. शेतकरी, विद्यार्थी अशा विविध सामाजिक घटकांशी ते बोलत आहेत. आज माऊली सभागृहात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ठाकरे म्हणाले की, मी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी फिरत आहे. जनतेचे प्रश्न सोडवणे हा माझा प्राधान्यक्रम आहे. बाकीच्या कुठल्या पदाबाबत मला स्वारस्य नाही. मुख्यमंत्रीपदाबाबत चंद्रकांत दादा पाटील नेमके काय म्हणाले, हे मला माहीत नाही. त्यामुळे मी त्यावर बोलणे उचित राहणार नाही.

संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधून त्यांचे प्रश्न सोडविणे हे माझे उद्दिष्ट आहे. त्यासाठीच महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात फिरून मी जनतेच्या प्रश्न आणि अडचणी जाणून घेत आहे, असेही ठाकरे म्हणाले.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like