धक्कादायक ! दडपशाही विरोधात महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांचा निनावी तक्रार अर्ज ?

दोन महिने झाले तरी ठोस कार्यवाही नाही ; कुलगुरूंच्या भूमिकेकडे लक्ष

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – राजकीय नेत्यांपेक्षा सुद्धा अधिक शेतकी महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांची दडपशाही असू शकते याचे मूर्तिमंत उदाहरण पुण्याच्या शेतकी महाविद्यालयात पाहण्यास मिळाले आहे. महात्मा फुले कृषी महाविद्यालय पुणे ०५ या महाविद्यालयातील एका सहाय्यक नियंत्रकाने त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे जीवन एवढे त्रस्त करून सोडले आहे कि स्वतःच्या नावाने त्यांच्या विरोधात तक्रार सुद्धा हे कर्मचारी करायला धजावत नाहीत अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

सार्वजनिक आस्थापनात अथवा खासगी कंपनीत सुद्धा दडपशाही चालते. मात्र कृषी महाविद्यालयात या दडपशाहीने परिसीमाच ओलांडली आहे. येथील सहाय्यक नियंत्रक यांच्यावर तब्बल ३१ प्रकारचे गंभीर आरोप करणारा तक्रार अर्ज कर्मचाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे लिहला आहे. तसेच महाराष्ट्राचे राज्यपाल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे कृषी मंत्री ,महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद- उपाध्यक्ष, कुलगुरू महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, अधिष्ठाता महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आदी महत्वाच्या व्यक्तींसह समाजसेवक अण्णा हजारे यांना देखील या अर्जाची प्रत पाठवण्यात आली आहे. तरीही संबंधित व्यक्तीवर कसलीही ठोस कार्यवाही अदयाप झालेली नाही. महात्मा फुले कृषी महाविद्यालय पुणे ०५चे प्राचार्य डॉ. प्रमोद रसाळ याच्या खुर्चीच्या खाली कर्मचाऱ्यांवर आजही राजरोजपणे अन्याय सुरूच आहे. या प्रकरणा संबंधी प्राचार्यांच्या थंड भूमिकेमुळे प्राचार्यच स्वतः सहाय्यक नियंत्रक यांच्या दडपशाहीचे शिकार आहेत का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के.पी. विश्वनाथा हे आपल्या कडक शिस्तीसाठी परिचित आहेत. मात्र त्यांनी सुद्धा या गंभीर प्रकणाकडे डोळेझाक केली या आहे. १ जानेवारी २०१९ रोजी पाठवलेल्या अर्जावर आजपर्यंत कसलीच ठोस कार्यवाही केली गेली नसल्यामुळे विद्यापीठ प्रशासन या जुलमी कर्मचाराचे लाड का करत आहे असा प्रश्न निर्माण होतो आहे. तसेच कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के.पी. विश्वनाथा यांनी सहाय्यक नियंत्रकाचे तातडीने निलंबन करून या प्रकरणाची निर्भय वातावणात चौकशी करण्यात यावी अशी मागणी महात्मा फुले कृषी महाविद्यालय पुणे येथील कर्मचारी दबक्या आवाजात करत आहेत. या मागणीची पूर्तता कडक शिस्तीचे कुलगुरू डॉ. के.पी. विश्वनाथा करणार का ? त्यांच्या या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाविद्यालयातील एका कर्मचाऱ्याने नाव उघड न करण्याच्या सबबीवर सदरची माहिती सांगितली असून त्यांनी सहाय्यक नियंत्रकांच्या विरोधात केलेल्या तक्रार अर्जात नमूद करण्यात आलेल्या ३१ मुद्यांवर देखील भाष्य केले आहे. यामध्ये सहाय्यक नियंत्रक यांनी केलेल्या भष्टाचाराची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

सहाय्यक नियंत्रक यांच्या विरोधातील तक्रार अर्जात नमूद करण्यात आलेले ३१ आरोपांचे मुद्दे

१. महिला कर्मचाऱ्यांची अधिक प्रमाणत पिळवणूक करणे. तसेच एका महिलेला दिलेल्या त्रासामुळे तिने स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे.

२. धनादेश चोरणे, लपवून ठेवणे. पुरवठादार आर्थिक लाभ देण्यास तयार होत नाही तोपर्यंत त्याचे धनादेश लपवून ठेवणे इत्यादी.

३. महाविद्यालयातील साहित्य लंपास करून आपल्या नगरच्या घरी ठेवणे.

४. देय्यकांची चोरी करणे. पुरवठादाराचे बिल देय्यकातून काढून घेणे

५. वरिष्ठांना चुकीची माहिती देणे. तसेच कर्मचाऱ्यांचे आपसात वाद घडवून आणणे

६. स्वतः अनुसूचित जातीचे असल्याने जातीचा धाक दाखवून दुसऱ्यावर अन्याय करणे

७. रोखवही कोरी ठेवणे

८. छोट्या पुरवठादारांकडून पैशाची मागणी करणे, पंचपकवांन्नाच्या भोजनाची मागणी करणे

९.आपल्याला आर्थिक लाभ देणाऱ्या निविदाकर्त्याची निविदा मंजूर करण्यासाठी महाविद्यालय आणि विद्यापीठ प्रशासनावर राजकीय दबाव आणणे

१०.पुरवठादारांना आयकर वजावटीपासून वाचवणे

११. निविदा मंजूर करण्यासाठी निविदाकर्त्याकडून अर्थिक स्वरूपात आणि वस्तूच्या स्वरूपात मागणी करणे

१२.स्वतःच्या आणि आपल्या जवळच्या स्नेहींच्या आयकर वजावटी नभरणे

१३. जी.एस.टी , टी.डी. एस नभरणे

१४. जी.एस.टी , टी.डी. एसचा भरणा थकवून राष्ट्राचे आर्थिक नुकसान करणे

१५. आर्थिक लाभा पोटी किरकोळ दुरुस्त्या करून निविदा मंजूर करून देणे

१६. बदली प्रवास भत्ता घेऊन सरकारची सहाय्यक नियंत्रकांनी फसवणूक केली आहे

१७. कृषी म्हविद्यालयाच्या अथितीगृहावर राहून अर्धवट भाडे भरणे आणि सरकार कडून घरभाडे भत्ता उखळणे

१८. महाविद्यालायाच्या आवरत निवास करून सरकारकडून वाहन भत्ता उखळणे

१९. पुण्यात राहून प्रवास देय्यकाच्या सवलतीचा लाभ घेणे

२०. सर्व्हर देखभाल खर्च म्हणून महाविद्यालयाच्या गंगाजळीतून पैसे उखळणे

२१. फाईल ट्रॅकींग सिस्टमच्या नावावर सरकारकडून पैसे उखळणे

२२. रोकड मोजणी मशीनची मान्यता नसताना विद्यापीठाच्या पैशातून रोकड मोजणी मशीन खरेदी करणे

२३. रीतसर रजा टाकलेली नसताना कामावर गैरहजर राहणे

२४. कामगार पुरवठादार नवनाथ कोल्हे याच्याशी घनिष्ठ आर्थिक लाभाचे संबंध ठेवणे. पैसे घेऊन त्याची निविदा मंजूर करून देणे

२५. कनिष्ठ कर्मचाऱ्यांची देय्यके फाडणे, लपवून ठेवणे आणि त्यांना लाभा पासून वंचित ठेवणे

२६. चौकशी अधिकाऱ्यासोबत लागेबांधे करून स्वतः वरील संकट परतवून लावणे

२७. कनिष्ठ कर्मचाऱ्यांचा मानसिक छळ करणे आणि त्यांना असभ्य भाषेत बोलणे

२८. स्वतःचे काम इतरांकडून करून घेणे. खर्चाचा ताळमेळ नठेवता कनिष्ठ कर्मचाऱ्यांकडून कामे करून घेणे

२९. सेवा पुस्तकात लाल शाईने नोंदी पडेपर्यंत गैरवर्तन करणे

३०. महाविद्यालयातील स्वतःच्या दालनाचा आणि अथातिगृहाचा गैरवापर करणे

३१. विद्यापीठाच्या रकमेचा बेहिशोबी खर्च करणे. उदारणार्थ प्राप्त अनुदानापेक्षा जास्त रक्कम खर्च करणे