Photo : पोलिसाचे अपहरण करून मारहाण, ‘राष्ट्रवादी’च्या नगरसेवकाला अटक

'एलसीबी'ची कारवाई

नगर : पोलीसनामा ऑनलाइन – पोलिसाचे अपहरण करून मारहाण केल्याच्या गुन्ह्यातील फरार असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगरसेवक सुनील त्र्यंबके याला अटक करण्यात आली आहे. आज दुपारी नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. या कारवाईनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्याच्या आवारात गर्दी केली होती.

सुनील त्र्यंबके याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने पोलीस कर्मचार्‍यास त्यांच्या राहत्या घरून दुचाकीवर बळजबरीने बसवून संपर्क कार्यालयात आणले. त्यानंतर नगरसेवक त्र्यंबके व त्याच्या साथीदारांनी सदर पोलीस कर्मचाऱ्यास लाकडी दांडके, लोखंडी गजाने बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत सदर पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला होता.

याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अपहरण करून गंभीर दुखापत केल्याचा गुन्हा नगरसेवक सुनील त्रिंबके व त्याच्या साथीदारांविरुद्ध दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील हे करीत होते. नगरसेवक त्र्यंबके हा सावेडी उपनगर फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती. त्यावरून त्यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून त्र्यंबके याला अटक केली.

नगरसेवक त्रंबक याला अटक करताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्याच्या आवारात गर्दी केली होती. त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

सिने जगत –

Video : छोटया पडद्यावरील ‘हॉट’ अभिनेत्री निया शर्माची ‘सोशल’वर धुमाकूळ

‘लैंगिक’ अत्याचाराचा आरोप झाल्यानंतर भडकला ‘हा’ अभिनेता म्हणाला, मी नशेमध्ये…

… म्हणून अभिनेता शाहिद कपूरची प्रत्येक चित्रपटात ‘हटके’ हेअर ‘स्टाईल’

‘लस्ट स्टोरीज’मधील ‘व्हायब्रेटर सीन’बाबत कियारा आडवाणीचा मोठा ‘खुलासा’

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like