अहमदनगर : ‘त्या’ 300 कोटींचे काय झाले ?, माजी सभापतींचे पंतप्रधानांना पत्र

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – महापालिका निवडणूक होऊन आठ महिन्यांचा कालावधी उलटून गेला. मात्र घोषणा केल्याप्रमाणे ३०० कोटीपैकी एक रुपयाही महापालिकेला मिळाला नाही. या निधीचे काय झाले, असा सवाल करणारे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती सोनाबाई तायगा शिंदे यांनी पोस्टाने पाठविले आहे.

या पत्रात म्हटले आहे की, महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपाचा महापौर झाल्यास शहराच्या विकासासाठी ३०० कोटी रुपये देऊ, अशी घोषणा तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केली होती. तसेच त्यावेळी मुख्यमंत्र्यांचीही सभा शहरातील गांधी मैदान येथे झाली होती. त्यांंनीही शहरासाठी मोठा निधी देण्याची घोषणा केली होती. मात्र गेल्या आठ महिन्यांच्या काळात एक रुपयाचाही निधी महापालिकेला मिळाला नाही. महापालिका निवडणुकीनंतर  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने जिल्ह्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेतील भाजपाच्या महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती सोनाबाई तायगा शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्टाने पत्र पाठविले आहे.

यापूर्वी त्यांनी १५ जुलै रोजी मुख्यमंत्र्यांना स्मरणपत्र दिले होते. मात्र त्यावर कुठलीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे शिंदे यांनी आता थेट पंतप्रधानानांच पत्र पाठविले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like