राजकीय वादातून सर्जेपुरात हाणामारी, दगडफेकीमुळे तणाव : पोलिसांचा चोख बंदोबस्त

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – सर्जेपुरा परिसरात निवडणुकीच्या वादातून दोन राजकीय नेत्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. यावेळी जोरदार दगडफेक व मारहाणीच्या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाल्यानंतर तणाव निवळला.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, नगरसेवक मुदस्सर शेख व माजी नगरसेवक आरिफ शेख यांच्यात महापालिका निवडणुकीत आमने-सामने लढत झाली होती. या निवडणुकीत मुदस्सर शेख यांनी आरिफ शेख पराभव केला होता. तेव्हापासून अरिफ शेख व त्यांचे समर्थकांचा मुदस्सर शेख यांच्या विरोधात रोष होता. त्या रोषातूनच आज सायंकाळी किरकोळ वादाचे निमित्त घडले व दोन गटांमध्ये लाठ्या-काठ्या, लोखंडी गज, हॉकी स्टिक आदी शस्त्रांनी हाणामारी सुरू झाली.

यावेळी एकमेकांवर जोरदार दगडफेक करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलिसांनी मोठ्या फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ पोलीस अधिकारीही दाखल झाले. पोलिसांनी जमावाला पांगविले. त्यानंतर तणाव निवळला.

Loading...
You might also like