अहमदनगर : आरासीच्या खर्चाला टाळून यंदा पूरग्रस्तांना मदत, गणेश मंडळाच्या बैठकीत निर्णय

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – कोल्हापूर-सांगली यासारखे भागांमध्ये गेल्या अनेक दिवसापासून पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या भागातील नागरिकांचे जीवनावश्यक वस्तूंवर परिणाम झाला आहे. या सर्व पूरग्रस्त लोकांसाठी मदतीचा हात म्हणून नगर शहरातील गणेश मंडळ पुढे आले आहेत. यंदाच्या वर्षी गणपती उत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जाणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. या बैठकीमध्ये विविध मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. पदाधिकाऱ्यांनी आपलं मत व्यक्त करताना चौकातील भंडारा व आरस यासारख्या गोष्टी न करता आम्ही त्या भागाला मदत करणार असल्याचे मंडळाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

यावेळी शिवसेना माजी शहरप्रमुख संभाजी कदम म्हणाले की, आम्ही आमच्या मंडळाच्यावतीने भंडारा, आरास व त्याचबरोबर ‘डीजे’ही लावणार नाही. आमच मंडळ यावेळेस साध्या पद्धतीने गणेश मूर्तीची स्थापना करणार असल्याचे कदम म्हणाले.  नगरसेवक अविनाश घुले, बाळासाहेब बोराटे, दत्ता कावरे व माजी नगरसेवक विपुल शेटिया यांनीही आपल्या मंडळाच्यावतीने जेवढा खर्च होतो, ते सर्व पूरग्रस्तांना देण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी नगर शहरातील छोटे-मोठे सर्व मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते.आरोग्यविषयक वृत्त