कायदा-सुव्यवस्था बिघडविण्यांऱ्यांची गय नाही : कैलास देशमाने

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – कायदा-सुव्यवस्था बिघडविण्यांऱ्यांची गय केली जाणार नाही. वेळीच शहाणे व्हा अन्यथा जेलची हवा खायला तयार रहा, असा इशारा सोनई पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यांनी पानेगाव( ता.नेवासा )येथील विशेष ग्रामसभेत बोलत टाना दिला.

ग्रामसभेच्या अध्यस्थानी जेष्ठ नागरिक दशरथ जंगले हे होते. यावेळी देशमाने यांनी सांगितले की, या अगोदर परीसरातील वाढलेले रोडरोमिओंचे प्रमाण तसेच टारगटपणा यावर लक्ष ठेवण्यासाठी येथील सीसीटीव्ही कॅमेरे फुटेज हे आता सोनई पोलीस ठाण्यात कनेक्टिव्हिटी करण्यात येणार आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनींना कोणी त्रास देत असेल, तर त्यांच्यावर ‘पोस्को’ अंतर्गत कारवाई करण्यात येईल.

दोन वर्षांपूर्वी गावामध्ये मोठा जातीय तणाव वाढला होता. यावेळी जातीय सलोखा बैठकीत तत्कालीन शेवगावचे उपविभागीय पोलीस उपअधीक्षक अभिजित शिवथरे यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली लोकवर्गणीतून गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. तेेव्हापासून आजपर्यंत गावात कुठलाही अनुसूचित प्रकार घडलेला नाही, अशी मागणी शिवप्रहार संघटनेचे अध्यक्ष किशोर जंगले यांनी केली.

प्रास्ताविक मध्ये संदिप जंगले यांनी आपल्या भाषणात म्हटले की,गावात कोणी जातिय तणाव निर्माण करत आसेल तर ते यशस्वी होऊ देणार नाही. यावेळी पोलीस पाटील बाबासाहेब जंगले,तंटामुक्ती समितीचे उपाध्यक्ष बाळासाहेब नवगिरे भिकाजी जंगले, सुर्यभान खडके,श्रीकांत जंगले,योगेश घोलप,भारत जंगले,लक्ष्मण जंगले,पप्पू जंगले,सुनील गुडधे,सुनील चिंधे, सतिष वाघमारे, सोमनाथ शेंडगे, माजी सरपंच बाळासाहेब जंगले,बाबासाहेब शेंडगे, तानाजी गायकवाड, गणेश चिंधे, रामचंद्र सोनवणे,विशाल जंगले,सुर्यभान रोडे आभार डॉ. काकडे यांनी मानले.