मुळा पाटबंधारे कार्यालयाच्या इमारत पत्र्यावर बनले गार्डन !

नेवासा (जि. नगर) : पोलीसनामा ऑनलाइन – नेवासा फाटा येथील मुळा पाटबंधारे कार्यालयाच्या इमारतीवर पत्र्याच्या शेडवर पावसामुळे गवत उगवले आहे. इमारतीवर ठिकठिकाणी मोठे गार्डन तयार झाले आहे. हे गार्डन मोठे आकर्षण ठरले आसून पाटबंधारे विभागाचे साफसफाईकडे दुर्लक्ष होत असल्याने ही परिस्थिती ओढवली आहे.

मुळा पाटबंधारे उपविभागिय कार्यालयाच्या विश्रामगृहासमोर मोठ-मोठे गवत उगवल्यामुळे अतिथिंना विंचू-सपांचे दर्शन होत आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे वसाहतीची दुर्दशा झालेली आसून इमारतीजवळ असलेल्या झाडांमुळे या झाडाचे बी पत्र्यावर पडून मोठे गवत उगवले आहे. अधिकारी कर्मचारी या गार्डनकडे लक्ष घालत नसल्यामुळे या कार्यालयात येणाऱ्या जनतेनेला पत्र्यावरील गार्डनचा सुखद धक्का बसताना दिसून येत आहे. या शेडवर गार्डनचा बोजा झाल्याने पत्र्याच्चा शेडचे अँगल वाकले असून, दुर्घटना होण्याची शक्यत्या नाकारता येत नसल्याचे बोलले जात आहे.