Video : ‘वाढीव’ पोस्ट भोवली, ‘त्या’ अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आयुक्तांचे आदेश

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – दिलेले वृक्षलागवडीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी एका महापालिका अधिकाऱ्यांनी ‘झाडे लावा… क्वार्टर मिळवा’ अशी वादग्रस्त पोस्ट टाकली आहे. महापालिका कामगार यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी स्वच्छता निरीक्षक के. के. देशमुख याला निलंबित करण्याचे आदेश दिले आहे.

शासनाने दिलेले वृक्ष लागवडीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी शासनाच्या विविध विभागांकडून नागरिक, स्वयंसेवी संस्थांना झाडे लावण्यासाठी आवाहन केले जात आहे. वेगवेगळ्या पद्धतीने जनजागृती सुरू आहे. मात्र महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने त्यांच्याच कर्मचाऱ्यांसाठी भन्नाट योजना आखली असून ह्या योजनेची ‘झाडे लावा.. क्वार्टर मिळवा’ ही वादग्रस्त पोस्ट व्हाट्सअप ग्रुप व्हायरल केली आहे.

मनपाच्या विविध व्हाट्सअप ग्रुपवर हा संदेश व्हायरल झाला आहे. महापालिका कर्मचारी आक्रमक झाले आहे. कर्मचाऱ्यांना व्यसनाधीन बनविण्यासाठी अधिकारी प्रोत्साहन देत असल्याचा आरोप करण्यात आला. आयुक्त भालसिंग यांनी तात्काळ सदर प्रकाराची दखल घेत देशमुख याच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.

…नेमकी काय आहे पोस्ट ?

‘सर्व मुकादमांना सुवर्णसंधी.. पावसाळ्यात झाड लावा.. वाढवा आणि हिवाळ्यात माझ्याकडून क्वार्टर फ्री मिळवा.. झाडे लावा क्वार्टर मिळवा संधीचा लाभ घ्यावा’, असा हा संदेश आहे.

साजूक तुपामुळे होतात ‘हे’ ५ फायदे

अवेळी मासिक पाळी येण्याची ‘ही’ ४ प्रमुख कारणं, ‘ही’ काळजी घ्या

चिडचिडेपणा ‘या’ ५ गोष्टींमुळं वाढतो, जाणून घ्या

दिवसा ‘अवेळी’ झोप येत असेल तर ‘हे’ 4 उपाय करा, जाणून घ्या

झोप न येण्या मागं ‘ही’ कारणं, ‘ही’ काळजी घ्या

डोकेदुखीला ‘या’ घरगुती उपायांनी करा ‘बाय-बाय’

गॅस सिलेंडर लीक होत असल्यास ‘सुरक्षेसाठी’ करा हे उपाय

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like