अहमदनगर : …तर विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार ! शेतकरी आक्रमक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – दुष्काळामुळे शेतकरी पूर्णपणे कोलमडला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना सरसकट दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात यावी. विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकर्‍यांना कर्जमाफी न दिल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा बाबुर्डी बेंद ग्रामस्थांनी दिला आहे. तसा ठरावही ग्रामसभेत करण्यात आला आहे.

नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथे झालेल्या ग्रामसभेत शेतकर्‍यांना कर्जमाफी व साकळाई उपसा सिंचन योजनेबाबत विषय घेण्यात आले. गेल्या तीन-चार वर्षापासून अत्यल्प प्रमाणात होत असलेल्या पावसामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या डोक्यावरील ओझे कमी करण्यासाठी सरकारने शेतकर्‍यांना दीड लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी करण्यात यावी अशी सुचना निलेश चोभे यांनी माडली. त्यास सरपंच दिपक साळवे यांनी अनुमोदन दिले. उपसरपंच अण्णा चोभे यांच्यासह सर्वांनीच त्यास पाठिंबा दर्शविला.

ग्रामसभेला राजाराम चोभे, ग्रामपंचायत सदस्य संदीप चोभे, राघु चोभे, किरण चोभे, शरद चोभे, दत्तात्रय तोडमल, नाथा निकम, कुमार चोभे, दादा चोभे, सर्जेराव खेंगट, सतिष चोभे, जालिंदर चोभे, रवि रोकडे, प्रभारी ग्रामसेवक बनकर मॅडम आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, चारा छावणीची मुदत वाढविल्याबद्दल ग्रामस्थांनी शासनाचे आभार मानले. दरम्यान, कर्जमाफीचा निर्णय व साकळाई प्रश्‍न मार्गी न लागल्यास तीव आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

साकळाईचे काम सुरु न झाल्यास बहिष्कार
गेल्या अनेक वर्षांपासून निवडणुका आल्या की साकळाई योजनेचे गाजर दाखविले जात आहे. परंतु, अद्यापही साकळाई योजनेचा प्रश्‍न मार्गी लागायला तयार नाही. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अगोदर साकळाई उपसा जलसिंचन योजना मार्गी न लागल्यास विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचा ठराव नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद मधील ग्रासभेत घेण्यात आला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –