…तुम्हाला लाज वाटते का ? तहसिलदारांना सुनावले

छावणीसाठी शेतकरी आत्महत्याप्रकरणी आंदोलक आक्रमक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन –  नगर तालुक्यातील घोसपुरी येथील शेतकऱ्याने विष घेऊन आत्महत्या केल्याच्या प्रकरणात जिल्हा प्रशासनाने त्या शेतकऱ्याची जनावरे चारा छावणीत नव्हतीच, असा खुलासा केला आहे. परंतु कार्यकर्ते आक्रमक आहेत. तहसीलदार उमेश पाटील हे जिल्हा शासकीय रुग्णालयात पोस्टमॉर्टम रूम आवारात आले असता माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांनी ‘तुम्हाला मला लाज वाटत नाही का’, अशा शब्दांत तहसीलदारांना सुनावले. तसेच त्यांना हाकलून लावले. त्यामुळे पोलिस प्रशासनाने तहसीलदारांना पोलिस संरक्षणात तिथून बाहेर काढले. त्यामुळे या प्रकरणावरून आता चांगलेच वातावरण पेटू लागले आहे.

‘पोस्टमार्टेम’साठी मयत झरेकर यांचा मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलला आणला आहे. पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हरून मुलांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्यासह मोठा पोलिस फौजफाटा सिविल हॉस्पिटल परिसरात तैनात आहे. तसेच शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब कोरेगावकर शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ आदींसह कार्यकर्ते टीव्ही हॉस्पिटल मध्ये जमा झाले आहेत.

निवासी उपजिल्हाधिकारी विरुद्ध गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही अशा भूमिकेत कार्यकर्ते असल्यामुळे तहसीलदार उमेश पाटील हे आंदोलकांशी चर्चा करण्यास जमा झाले जि. प. सदस्य काढले व माजी सदस्य हराळ यांच्याशी पाटील हे चर्चा करण्यासाठी गेले त्यावेळी हराळ यांनी तहसीलदारांना खडे बोल सुनावले. खेड तहसीलदारांची लाज काढली व पोलिस प्रशासनाला तहसीलदारांना तिथून घेऊन जाण्यास सांगितले आहे त्यामुळे उपाधीक्षक मिटके हे तहसीलदार पाटील यांना तेथून घेऊन गेले. या घटनेमुळे तणाव निर्माण झाला आहे.

‘आमचा नगर जिल्ह्यातील प्रशासनावर विश्वास राहिला नाही. तुम्ही येथून निघून जा. अन्यथा वेगळे काहीतरी घडेल’, असा इशारा बाळासाहेब हराळ यांनी दिल्यानंतर पोलिसांनी तहसीलदार उमेश पाटील यांना तिथून बाहेर काढले.

…त्यांची जनावरे छावणीतच नव्हती!
मयत झरेकर यांची जनावरे चारा छावणीत नव्हतीच, असा खुलासा जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आला आहे. याबाबत प्रसिद्धीपत्रकही त्यांनी जारी केले आहे. झरेकर यांची जनावरे छावणीत नसल्यामुळे चारा छावणीसाठी त्यांनी आत्महत्या केली नसावी, असा खुलासा करण्याचा महसूल प्रशासनाचा प्रयत्न आहे.

आरोग्यविषयक वृत्त –