..तर सामूहिक विष प्राशन करू, छावण्यांसाठी शेतकरी आक्रमक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – प्रशासनाने बंद केलेल्या चारा छावण्या त्वरीत चालू करावे, या मागणीसाठी नगर तालुक्यातील शेतकऱ्यांसह शिवसैनिकांचा नगर तालुका तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. उद्या दुपारपर्यंत निर्णय झाल्यास सामूहीक विष प्राशन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

नगर तालुक्यातील चारा छावण्या बंद केल्याने नगर तालुक्यातील शेतकरी आणि शिवसैनिकांनी काल रास्ता रोको आंदोलन चालू केले होते. मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर आंदोलकांनी आज नगर तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन चालू करण्यात आले आहे. हे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. उद्या दुपारपर्यंत सरकारने चारा छावण्याबाबत निर्णय न घेतल्यास सामूहिक विष प्रशासन करणार असल्याचा आंदोलनकर्त्यांनी इशारा दिला आहे.

जिल्ह्यातील सरकारी कामकाज भ्रष्टाचाराने बरबटलेला असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांनी केला आहे. त्यांनी थेट निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करून पैसे मागितल्याचा आरोप केला आहे. त्यामध्ये सुद्या मुख्यमंत्री शिर्डी येथे येणार असून तेथेही काही घडू शकते, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like