पालकमंत्री प्रा. राम शिंदेंच्या नावाचा वापर करून ‘त्यांनी’ उकळले लाखो रुपये

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या नावाचा वापर करून शासकीय नोकरीचे आमिष दाखवून दोघांकडून प्रत्येकी दोन लाख याप्रमाणे चार लाख रुपये रुपये उकळले. सदर रक्कम परत मागितली असता जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. कर्जत तालुक्यातील मिरजगावमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी अक्षय अविनाश शिंदे व अविनाश शिंदे (दोघे रा. चौंडी, ता. जामखेड) कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, कर्जत तालुक्यात मिरजगाव येथे अक्षय शिंदे याने पालकमंत्री राम शिंदे यांच्या नावाचा वापर करून श्रीकांत आनंदा मांढरे (रा. बेलगाव, ता. कर्जत) यांची व त्यांचे मावस माऊ जयवंत रामचंद्र गायकवाड यांना शासकीय नोकरीला लावतो, असे म्हणून दोघांकडून प्रत्येकी २ – २ लाख रुपये रोख रक्कम असे एकूण ४ लाख रुपये येवून त्यांची फसवणूक करुन विश्वासघात केला.

दोन महिन्यापूर्वी मिरजगाव येथे स्टॅण्ड परिसरात तनपुरे पेट्रोल पंपासमोर एका हॉटेलच्या बाहेर अक्षय व अविनाश शिंदे हे उभे असताना तेथे श्रीकांत मांढरे व त्यांचा मित्र आशिष शिंदे गेले. ‘आमच्याकडून 4 लाख रुपये घेतले आहेत. आमच्या नोकरीचे काय झाले’, अशी विचारणा केली. अक्षय शिंदे याने श्रीकांत मांढरे यांना जातीवाचक शिवीगाळ करुन ‘पुन्हा जर पैसे मागितले तर तुमचा मुडदा पाडून टाकू. पालकमंत्री राम शिंदे हे आमच्या घरचे असून कोणाला काही कळणार नाही’, असे म्हणून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अविनाश शिंदे यानेही जातीवाचक शिवीगाळ करीत दमदाटी केली.

याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात श्रीकांत आनंद मांढरे यांच्या फिर्यादीवरून अक्षय शिंदे, अविनाश शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपअधीक्षक सातव हे करीत आहे.

व्यायाम केल्यास ‘मधुमेहात’ होऊ शकते सुधारणा
‘स्मरणशक्ती’ वाढविण्यासाठी हे रामबाण उपाय आवश्य करा
‘या’ व्यसनांमुळे बिघडते तुमचे ‘आरोग्य’, या व्यसनांपासून कायम राहा दूर
अहो आश्चर्यम ! ‘वजन’ कमी करण्यासाठी रात्री फक्त ‘हे’ करा