मतमोजणीच्या ठिकाणी प्रतिबंधकात्मक आदेश

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – लोकसभा सार्वत्रिकनिवडणुक- 2019 अंतर्गत अहमदनगर जिल्‍हयात 37-अहमदनगर व 38- शिर्डी लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी दिनांक 23 मे 2019 रोजी वखार महामंडळ गोडावून एमआयडीसी नागापूर, अहमदनगर येथे करण्‍यात येणार आहे.

मतमोजणीचे दिवशी मतमोजणी केंद्राचे परिसरात उमेदवार व त्‍यांचे कार्यकर्ते मोठया प्रमाणात हजर राहण्‍याची शक्‍यता आहे आणि मतमोजणी प्रक्रियेत खीळ घालण्‍याचे उद्देशाने व बाधा निर्माण करण्‍याच्‍या हेतूने काही अपप्रवृत्‍ती कार्यरत होण्‍याची शक्‍यता आहे. या पार्श्‍वभूमीवर मतमोजणी प्रक्रीया शांततेत पार पाडाव्यात आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून फौजकादी प्रक्रिया संहिता 1973 च्‍या कलम 144 नुसार प्राप्‍त अधिकाराचा वापर करुन जिल्हादंडाधिकारी राहुल द्विवेदी यांनी प्रतिबंधक आदेश जारी केले आहे.

जिल्‍हादंडाधिकारी अहमदनगर यांच्‍या आदेशान्‍वये फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्‍या कलम 144 नुसार प्राप्‍त अधिकारान्‍वये खालीलप्रमाणे आदेश परीत करण्‍यात येत आहे.

वडार महामंडळ गोडावून एमआयडीसी नागापूर अहमदनगर या ठिकाणी कोणत्‍याही व्‍यक्‍तीस मतमोजणी ठिकाणापासून 200 मीटर अंतराच्‍या आतील कोणत्‍याही सार्वजनिक वा खाजगी जागेमध्‍ये – निवडणूकीचे मतमोजणी प्रक्रियेच्‍या कर्तव्‍यावर नियुक्‍त सरकारी अधिकारी/ कर्मचारी ज्‍यांना परवानगी देण्‍यात आलेली आहे असे उमेदवार व त्‍यांचा निवडणूक प्रतिनिधी मतमोजणी प्रतिनिधी तसेच भारत निवडणूक आयोगातर्फे परवानगी देण्‍यात आलेल्‍या व्‍यक्‍ती यांच्‍या व्‍यतिरिक्‍त कोणीही मतमोजणी केंद्रात प्रवेश करणार नाही.

निवडणूक मतमोजणी प्रक्रियेच्‍या कामासंबंधी जिल्‍हा निवडणूक अधिकारी अहमदनगर यांनी परवानगी दिलेल्‍या व्‍यक्‍ती व्‍यतिरिक्‍त मोबाईल फोन किंवा कॅमेरा मतमोजणी ठिकाणचे 200 मीटरचे आतील परिसरात घेऊन जाणार नाही किंवा 200 मीटरच्‍या आतील परिसरात पी सी ओ चालू ठेवणार नाही. कोणीही व्‍यक्‍ती शस्‍त्र, क्षेपक काडयांची पेटी, लायटर, इतर कोणतीही आक्षेपार्ह वस्‍तू ,वॉकी-टॉकी, कॉडलेस टेलिफोन ,ज्‍वलनशील पदार्थ घेऊन मतमोजणी केंद्रात प्रवेश करता येणार नाही.

मतमोजणीचे ठिकाणापासून 200 मीटरच्‍या आत कोणत्‍याही पक्षाचे कार्यालय किंवा उमदेवाराचे कार्यालय उघडे राहणार नाही किंवा राजकीय होर्डिंग ,बॅर्नर , नोटीस फलक, झेंडे लावणे जाणार नाहीत. परवानगी देण्‍यात आलेल्‍या वाहना व्‍यतिरिक्‍त मतमोजणी केंद्रापासून 200 मीटर परिसरात कुठेही वाहन येणार नाही. उमेदवार व त्‍याचा निवडणूक प्रतिनिधी ,मतमोजणी प्रति‍निधी हे कोणीही मतमोजणी केंद्रात पेन, कागद, नोटपॅड व लेखन साहित्‍य आणणार नाहीत.

तसेच निवडणूकीचा निकाल लागल्‍यानंतर अहमदनगर जिल्‍हयाचे महसूल स्‍थळसिमेच्‍या हद्दीत संबंधीत पोलिस अधिकारी यांची परवानगी घेतल्‍याशिवाय कोणीही मिरवणूक काढणार नाहीत. कोणीही निवडणूकीत पराभूत उमदेवाराच्‍या घराजवळ वा इतरत्र जमा होणार नाहीत व प्रक्षोभक घोषणा देणार नाहीत.