नगर : तब्बल ३९६ यंत्रे बंद पडली ; १ वाजेपर्यंत ३४.७३ टक्के मतदान

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – नगर मतदारसंघात सकाळपासून अनेक मतदान यंत्रे बंद पडली. तब्बल ३९६ यंत्रे बंद पडल्याने काही बदलली, तर अनेक दुरुस्त करण्यात आली. मतदान यंत्रे बंद पडण्याच्या घटनेमुळे निवडणूक अधिकारी यांची चांगलीच धावपळ उडाली. तसेच मतदान प्रक्रियेत अनेकदा व्यत्यय आला. दुपारी एक वाजेपर्यंत ३४.७३ टक्के मतदान झाले आहे.

मतदान केंद्रात मतदानयंत्रात वारंवार बिघाड होताना दिसत आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत ३४ बॅलेट युनिट, १६ कंट्रोल युनिट, २८ व्हीव्हीपॅट बदले आहे. मतदार संघात ३९६ यंत्रे बंद पडली आहेत. असे असले तरी मतदारांचा उत्साह कायम दिसून येत आहे. दुपारी एक वाजेपर्यंत ३४.७३ तर टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला.

मतदान यंत्रे बंद पडण्याच्या प्रक्रियेमुळे अधिकारी व मतदारांनाही चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. जुनी मतदान यंत्रे असल्यामुळेच वारंवार बिघाड होत असावी, असे निवडणूक सूत्रांनी सांगितले आहे.