डोळ्यात मिरची टाकून महिलेशी लगट

अहमदनगर : पोलीसनाम ऑनलाइन – जमिनीच्या वादातून दलित महिलेच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून लगट करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात विनयभंगासह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

यातील फिर्यादीला आरोपींनी पोलिसांसमोर मारहाण करून खोटा गुन्हा मंगळवारी दाखल केला, अशी माहिती मिळाली. संबंधित कुटुंब मोलमजुरी व शेती करून उपजीविका करते. त्यांच्या मालकीची शेतजमीन आहे. दादा गोलांडे हा दमदाटी करून हे शेत आमचे आहे, असे म्हणून शिवीगाळ करत असे.

१५ जुलैला सायंकाळी साडेचारच्या सुमारास फिर्यादी शेतातून पाणी आणण्यासाठी जात असताना भाऊसाहेब गोरख गोलांडे याने लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. त्यांची झटापट झाली. आरोपीने महिलेस धक्काबुक्की व जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.

याबाबत बेलवंडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. १६ जुलैला सकाळी ८ च्या सुमारास फिर्यादीच्या पतीस गोरख गोलांडे, राजू गोलांडे, भाऊसाहेब गोलांडे यांनी मारहाण केली. महिला पतीस सोडवण्यासाठी गेली असता भाऊसाहेब गोलांडेने मिरची पावडर तिच्या डोळ्यात टाकली आणि खाली पाडून मारहाण केली. पतीचे हातपाय बांधून राजीव गोलांडे व भाऊसाहेब गलांडे यांनी पिकअपमध्ये टाकून मारहाण करत बेलवंडी पोलिस ठाण्यासमोर आणून पोलिसांसमोरही मारहाण केली.

केसगळती होतेय का ? ‘हे’ ६ साधे-सोपे घरगुती उपाय करा

आंब्यातील कोय फेकू नका, उपयोगात आणल्यास करेल औषधाचे काम

‘सुपारी’ खाऊन ‘या’ ४ आजारावर करा कंट्रोल, जाणून घ्या

आरोग्यासंदर्भातील ‘या’ महत्वाच्या ११ प्रश्‍नांची उत्‍तरे आवश्य जाणून घ्या !

सावधान !  लहान मुलं सतत मोबाईल घेत असतील तर ‘हे’ नक्की वाचा

‘या’ ४ घरगुती उपायांनी करा कुरळे ‘केस’ सरळ

Loading...
You might also like