अहमदनगर मनपा : मंजूर विषय पुन्हा महासभेत

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – महानगरपालिकेच्या 16 जुलैला होणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये एमआरट्रेड सेंटर यास छत्रपती शिवाजी राजे क्रीडा व व्यापारी संकुल असे नामकरण करण्याचा विषय विषय पत्रिकेत आलेला आहे. मात्र 2012 साल याबाबत महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये सर्वानुमते नाव बदलण्याचा ठराव करण्यात आला असूनही पुन्हा हा विषय विषयपत्रिकेत आला. यातून सत्ताधार्‍यांनी मंजूर प्रस्तावाचे पुन्हा राजकारण सुरू केल्याची चर्चा सुरू झाली आहे.

तत्कालीन उपमहापौर गीतांजली काळे व नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी वाडिया पार्क क्रीडा संकुलाचे नाव शिवाजीराजे क्रीडा व व्यापारी संकुल करण्याबाबत पाठपुरावा केला होता. त्यानंतर सर्वसाधारण सभेमध्ये ठराव घेऊन दहा दिवसांच्या आत क्रीडा संकुलाचे नाव छत्रपती शिवाजी राजे क्रीडा व व्यापारी संकुल करावे, असा ठराव मंजूर करून त्यास येणाऱ्या खर्चासही सभेने मंजुरी दिली होती. मात्र त्याची अंमलबजावणीच केली नाही. पुन्हा आता तोच विषय घेऊन सत्ताधारी भाजप राजकारण करत असल्याची चर्चा नगरसेवकांत सुरू झाली आहे. त्यावेळी ठरावाला मंजुरी देणारेच नगरसेवक आता सत्ताधारी पक्षात आहेत. मात्र मंजूर विषय पुन्हा विषय पत्रिकेत घेणेबाबत प्रशासनाची चूक आहे की सत्ताधाऱ्यांचे राजकारण आहे, यावर चर्चा रंगू लागली आहे.

पेनकिलर ऐवजी ‘हे’ घरगुती उपाय करा, तत्काळ ‘रिलीफ’ मिळेल

पोटदुखीसह त्वचा आणि केसांच्या समस्यांवर ‘हे’ गुणकारी औषध, जाणून घ्या

‘ही’ ४ झाडे विविध आजारांवर उपयोगी, जाणून घ्या

‘हा’ योगा केल्याचे ४ फायदे, वेळोवेळी पाणी पिण्याची नाही गरज

‘हे’ उपाय केल्याने चेहरा होईल ‘चमकदार’ ; फेशिअलची गरज नाही

अनेक आजारांवर प्राचीन काळातील ‘हे’ २४ ‘रामबाण’ उपाय, जाणून घ्या