‘झाडे लावा, क्वार्टर मिळवा’ अधिकार्‍याच्या या वादग्रस्त पोस्टमुळं सर्वत्र खळबळ

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – दिलेले वृक्षलागवडीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी एका महापालिका अधिकाऱ्यांनी ‘झाडे लावा… क्वार्टर मिळवा’ अशी वादग्रस्त पोस्ट टाकली आहे. ही पोस्ट व्हायरल झाली असून, महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. सदर अधिकाऱ्याविरुद्ध कामगार युनियन आक्रमक पवित्रा घेण्याच्या विचारात आहे.

शासनाने दिलेले वृक्ष लागवडीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी शासनाच्या विविध विभागांकडून नागरिक, स्वयंसेवी संस्थांना झाडे लावण्यासाठी आवाहन केले जात आहे. वेगवेगळ्या पद्धतीने जनजागृती सुरू आहे. मात्र महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने त्यांच्याच कर्मचाऱ्यांसाठी भन्नाट योजना आखली असून ह्या योजनेची ‘झाडे लावा.. क्वार्टर मिळवा’ ही वादग्रस्त पोस्ट व्हाट्सअप ग्रुप व्हायरल केली आहे.

मनपाच्या विविध व्हाट्सअप ग्रुपवर हा संदेश व्हायरल झाला आहे. महापालिका कर्मचारी आक्रमक झाली आहे. अधिकाऱ्याकडून कर्मचाऱ्यांना व्यसनाधीन बनविण्यासाठी अधिकारी प्रोत्साहन देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

…नेमकी काय आहे पोस्ट ?

‘सर्व मुकादमांना सुवर्णसंधी.. पावसाळ्यात झाड लावा.. वाढवा आणि हिवाळ्यात माझ्याकडून क्वार्टर फ्री मिळवा.. झाडे लावा क्वार्टर मिळवा संधीचा लाभ घ्यावा’, असा हा संदेश आहे.

‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा

‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या

दातांच्या समस्येवर करा  ‘हे’ घरगुती उपाय

बीट खाल्याचे ‘हे’ चमत्कारिक फायदे ; ‘खुंटते कॅन्सरग्रस्त कोशिकांची वृध्दी’, जाणून घ्या

लहान मुलांना दुधीदात येत असताना होणाऱ्या त्रासावर करा ‘हे’ ५ उपाय

Loading...
You might also like