‘क्‍वार्टर’ची ऑफर करणार्‍या कर्मचार्‍याच्या मदतीसाठी भाजपच्या ‘या’ नगरसेवकाचा पुढाकार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – ‘झाडे लावा, क्वार्टर मिळवा’, अशी ऑफर करणारे महापालिकेचेे स्वच्छता निरीक्षक के. के. देशमुख यांच्या मदतीसाठी भाजपचा नगरसेवक भैय्या गंधे सरसावला आहे. त्यांनी आज महासभेत देशमुख यांचे निलंबन मागे घेण्याची मागणी केली. आयुक्तांनीही निलंबन रद्द करण्याबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले.

‘पार्टी विथ डिफरन्स’ मानल्या जाणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकाने चक्क दारूची ऑफर करणाऱ्या कर्मचार्‍यांच्या पाठीशी उभे राहण्याचा भूमिका घेतली. आज सुरू असलेल्या सर्वसाधारण सभेत त्यांनी ‘व्हाट्सअप’वर झाडाच्या बदल्यात दारूची ऑफर करणाऱ्या नगरसेवकाचे निलंबन मागे घ्यावे, अशी जोरदार मागणी नगरसेवक भैय्या गंधे यांनी केली. त्यावर आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी याबाबत लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

महापालिकेत स्वच्छता निरीक्षक म्हणून काम करणाऱ्या देशमुख यांनी वृक्ष लागवडीसाठी प्रोत्साहन देताना ‘झाड लावा, क्वार्टर मिळवा’, अशी ऑफर केली होती. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने महापालिका प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेतली. आयुक्त भालसिंग यांनी स्वच्छता निरीक्षक देशमुख यांच्या निलंबनाचे आदेश दिले होते. त्यानुसार त्यांना सेवेतून निलंबित केलेले आहे. परंतु, सदर घटनेत एक आठवडा होण्यापूर्वीच भाजप नगरसेवक देशमुख यांच्या मदतीला धावला आहे. त्यांच्याविरुद्धची निलंबन कारवाई तात्काळ मागे घेण्याची मागणी नगरसेवक गंधे यांनी केली आहे. आयुक्तांनीही त्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे नैतिकतेच्या गप्पा ठोकणाऱ्या भारतीय जनता पक्षाला असे नगरसेवक चालतात का, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

जाणून घ्या अंडी खाण्याचे नुकसान ; ‘या’ लोकांनी अंडी खाणे टाळावे

सावधान ! ‘पेरॉसिटोमॉल’च्या ज्यादा सेवनाने ‘लिव्हर’ला धोका, ‘ही’ आहेत कारणे

‘हे’ 3 फायबर फूड कंट्रोल करतात ‘हाय ब्लड प्रेशर’ ; कमी होतो हार्ट अटॅकचा ‘धोका’

वजन कमी करायचंय तर ‘ही’ कॉफी डाएट नक्की करा

मेनोपॉज मध्ये स्वस्थ राहण्यासाठीचे ‘हे’ ६ उपाय

‘हे’ आहेत गुणकारी कोहळ्याचे फायदे, जाणून घ्या