‘त्या’ नामांकित वकील कुटुंबियांना अटक पोलिसांना भोवली, तपासी अधिकाऱ्याला ५ लाखांचा दंड

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात एकाच कुटुंबातील तीन वकिलांना अटक केल्याप्रकरणी राज्य शासनाने त्यांना 5 लाख रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. ही रक्कम तपासी अधिकाऱ्याकडून वसूल करण्याचा आदेश दिला आहे. सदर दंडाची रक्कम 45 दिवसांच्या आत द्यावी, अन्यथा विलंब झाल्यास 8 टक्के दराने व्याज देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. या आदेशामुळे पोलिस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

ॲड. अभिजीत राजेश कोठारी याच्याविरुद्ध बलात्कार केला व त्याच्या कुटुंबातील वडील ॲड. राजेश कोठारी, आई ॲड. मंगल कोठारी, बहीण रेणू झरेकर-कोठारी यांनी शिवीगाळ, दमदाटी केली होती. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात राजेश कोठारी, मंगल कोठारी व रेणू कोठारी यांचा सहभाग बलात्काराच्या नव्हे, तर जामीनपात्र स्वरूपाच्या 7 वर्षाखालील शिक्षा असलेल्या गुन्ह्यात होता. तरीही गुन्ह्यात तिघांना अटक करण्यात आली होती.

सन 2014 रोजी ही अटक झाली होती. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायमूर्ती सोनवणे, न्यायमूर्ती नलावडे यांनी राज्य शासनाला तिघांना पाच लाख रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. सदर रक्कम तपासी अधिकारी असलेले पोलीस उपनिरीक्षक विशाल सणस यांच्याकडून वसूल करण्याचे आदेश दिले आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like