पोलीस कर्मचार्‍याचे ‘फॉर्च्युनर’मधून ‘किडनॅपिंग’ ; पोलीस निरीक्षकाकडून ‘सिनेस्टाईल’ पाठलाग-थरार, पुढं झालं असं काही

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या फॉर्च्युनर गाडीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे अपहरण करण्यात आले. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी कारने सदर गाडीचा सिनेस्टाईल पाठलाग करून बेलापूर रोडवर त्याला अडविले. श्रीरामपूर शहरात घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात विजय मकासरे (रा.राहुरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी रिचर्ड रघुवीर गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बुधवारी (दि.१०) सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत पोलीस ठाणे अंमलदार मदतनीस म्हणुन ड्युटी होती. दुपारी सव्वादोन वाजताच्या सुमारास पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी केबीनमध्ये बोलावून कळविले की, आताच एक फोन आला असुन पोलीस स्टेशनच्यासमोर एक फॉर्च्युनर गाडी रस्त्यावर अडथळा होईल, अशा पद्धतीने उभी आहे. तुम्ही सदरची गाडी रस्त्यावरुन काढुन अडथळा दूर करा व गाडी पोलिस स्टेशनला आणा, असे सांगीतले. त्यावर गायकवाड यांनी बाहेर जाऊन पाहीले असता नेवासा रोडने जाणाऱ्या बाजुला एक फॉर्च्युनर गाडी (नं. एम.एच.१५ सी.टी. ९४४४ ) ही रस्त्यावर वाहतुकीस अडथळा होईल, अशा रितीने उभी होती.

सदरची गाडी चालकाची थोडावेळ वाट पाहीली. त्यानंतर साधारणत: पावणे तीन वाजण्याच्या सुमारास एक इसम गाडीजवळ आला. गाडी चालु करु लागला. तेव्हा गायकवाड यांनी त्यास तुम्ही गाडी रस्त्यावर वाहतुकीस अडथळा होईल, अशारितीने उभा केलेली आहे. गाडी पोलीस स्टेशनला घ्या, असे सांगितले. तेव्हा सदर इसमाने काहीएक न ऐकता गाडी चालू करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा गायकवाड हे गाडीमध्ये बसून त्यास तुम्ही गाडी पो.स्टे.ला घ्या, असे म्हणाले. त्यावर गाडीचालकाने पुढच्या ‘यु टर्न’वरुन गाडी वळून घेत पोलिस स्टेशनला घेतो तुम्ही बसा’, असे म्हणून गाडी चालू करुन पुढे घेतली. पुढे आल्यावर गाडीचालकाने गाडी गांधी चौकातून यु टर्न न घेता पुढे बेलापूरच्या दिशेने भरधाव वेगात घेतली. त्यावर पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यास तुम्ही गाडी पोलिस स्टेशनला घ्या, असे सांगीतले. परंतु त्याने काहीएक न ऐकता गाडी भरधावपणे बेलापूर रोडने घेतली.

दरम्यान, पोलीस कर्मचारी गायकवाड यांनी तात्काळ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांना फोन करुन सांगीतले की, बळजबरीने गाडीत बसून चालक गाडी बेलापूर च्या दिशेने घेऊन जात आहे. पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी तातडीने कारमधून फॉर्च्युनर गाडीचा सिनेस्टाईल पाठलाग सुरु केला. काळे रसवंतीजवळ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट व किशोर जाधव असे पाठीमागून एका कारमधून मदतीसाठी आले. गाडीचालकांस हात देऊन थांबविण्याचा इशारा करू लागले. तेव्हा फॉर्च्युनर चालक हा गाडी न थांबविता गाडी जोरात वेडीवाकडी पणाने चालवू लागला. त्यानंतर थोडे अंतरावर गाडी थांबविण्यात आली. त्यावेळी पोलिस निरीक्षक बहिरट व किशोर जाधव यांनी गाडीचालकांस गाडीतून खाली उतरुन घेतले व पोलीस कर्मचारी गायकवाड यांची सोडवणूक केली.

‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या

वयाच्या पस्तिशीनंतर हाडे मजबूत राहण्यासाठी ‘हे’ उपाय करा

‘खसखस’मुळं होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा

दुधी भोपळा ‘वरदान’ ठरतयं मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडांच्या रूग्णांसाठी, जाणून घ्या